मास्लोची आवश्यकता अधिश्रेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अब्राहम मास्लो यांनी त्यांच्या १९४३ च्या संशोधनपत्र "अ थिअरी ऑफ ह्युमन मोटिव्हेशन" च्या मानसशास्त्रीय आढावा या जर्नलमध्ये मांडलेल्या मानसशास्त्रातील मास्लोची आवश्यकता अधिश्रेणी ही एक कल्पना आहे. [१] मास्लोने नंतर मानवांच्या जन्मजात कुतूहलाविषयीची त्यांची निरीक्षणे सामाविष्ट करण्याची कल्पना वाढवली. त्याचे सिद्धांत मानवी विकसनशील मानसशास्त्राच्या इतर अनेक सिद्धांतांशी समांतर आहेत, ज्यापैकी काही मानवांमधील वाढीच्या टप्प्यांचे वर्णन करण्यावर लक्ष केंद्रित करतात. सिद्धांत ही एक वर्गीकरण प्रणाली आहे ज्याचा ध्येय समाजाच्या सार्वभौमिक आवश्यकता त्याचा आधार म्हणून प्रतिबिंबित करणे, नंतर अधिक अधिग्रहित भावनांकडे जाणे. [२] आवश्यकता अधिश्रेणी अल्प आवश्यकतेत आणि वाढीव आवश्यकतेत विभागली गेली आहे, सिद्धांतामध्ये व्यक्तिवाद आणि गरजांचे प्राधान्य या दोन प्रमुख विषयांचा समावेश आहे. सिद्धांत सामान्यतः चित्रांमध्ये प्रसूची म्हणून दाखविला जात असला तरी, मास्लोने स्वतः आवश्यकतेच्या अधिश्रेणीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसूची तयार केला नाही. [३] [४] आवश्यकतेची अधिश्रेणी ही एक मानसशास्त्रीय कल्पना आहे आणि विशेषतः शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्यामध्ये मूल्यनिर्धारण करण्याचे साधन आहे. [५] अधिश्रेणी एक लोकप्रचलित कार्यचौकट आहे, उदाहरणार्थ समाजशास्त्र संशोधन, व्यवस्थापन प्रशिक्षण, [६] आणि उच्च शिक्षणात . [७]

जरी व्यापकपणे वापरले आणि संशोधन केले असले तरी, मास्लोच्या आवश्यकता अधिश्रेणी निर्णायक समर्थनाचे पुरावे नाहीत आणि सिद्धांताचे प्रामाण्यत्व शैक्षणिक क्षेत्रात वादग्रस्त आहे. [८] [९] [१०] [११] मूळ सिद्धांताची एक टीका जी सिद्धांताच्या नवीन आवृत्त्यांमध्ये सुधारित केली गेली आहे, ती अशी होती की मूळ अधिश्रेणी असे सांगते की उच्च पातळीवर जाण्यापूर्वी खालची पातळी पूर्णपणे समाधानी आणि पूर्ण झाली पाहिजे; असे पुरावे आहेत की पातळी सतत एकमेकांना अधिव्याप्त करतात. [२]

प्रसूचीच्या सर्वात पायाभूत चार पातळीत मास्लोने "अल्प आवश्यकता" किंवा "डी-आवश्यकता" असे म्हटले आहे: आदर, मैत्री आणि प्रेम, सुरक्षण आणि शारीरिक आवश्यकता. जर या "अल्प आवश्यकता" पूर्ण झाल्या नाहीत - सर्वात पायाभूत (शारीरिक) आवश्यकता वगळता - तेथे शारीरिक संकेत असू शकत नाहीत, पण व्यक्तीला चिंता आणि ताण जाणवेल. वंचितपणामुळेच कमीपणा निर्माण होते, म्हणून जेव्हा एखाद्याला अपूर्ण आवश्यकता असतात, तेव्हा ते त्यांना जे नाकारले जात आहे ते पूर्ण करण्यास प्रवृत्त करते. [१२] मास्लोची कल्पना सूचवते करते की एखाद्या व्यक्तीने दुय्यम किंवा उच्च-पातळी आवश्यकतांची तीव्र इच्छा (किंवा प्रेरणा यावर लक्ष केंद्रित) करण्यापूर्वी सर्वात पायाभूत आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत. पायाभूत आवश्यकता व्याप्तीच्या पलीकडे जाऊन सतत चांगल्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या प्रेरणेचे वर्णन करण्यासाठी मास्लोने " अधोप्रेरणा(इंग्रजी: मेटामोटिव्हेशन्) " हा शब्द देखील निर्मित केला. [१३]

शारीरिक आवश्यकता[संपादन]

शारीरिक आवश्यकता अधिश्रेणीचा आधार आहेत. या आवश्यकता मानवी जगण्यासाठी जैविक घटक आहेत. मास्लोच्या आवश्यकतांच्या अधिश्रेणीनुसार, शारीरिक आवश्यकता आंतरिक प्रेरणांमध्ये घटक असतात. मास्लोच्या सिद्धांतानुसार, मानवाला आंतरिक समाधानाच्या उच्च पातळीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रथम शारीरिक आवश्यकता पूर्ण करण्यास भाग पाडले जाते. [१] मास्लोच्या अधिश्रेणीत उच्च-स्तरीय आवश्यकता वाढविण्यासाठी, शारीरिक आवश्यकता प्रथम पूर्ण केल्या पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखादी व्यक्ती त्यांच्या शारीरिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी धडपडत असेल, तर ती सुरक्षितपणा, आपलेपणा, सन्मान आणि स्वतः ची वास्तविकता शोधण्यास तयार नव्हे.

शारीरिक आवश्यकतेत खालील घटक सामाविष्ट असू शकते:

सुरक्षा आवश्यकता[संपादन]

सुरक्षत्वाच्या आवश्यकतेत खालील घटक सामाविष्ट आहे:

  • आरोग्य
  • वैयक्तिक सुरक्षा
  • भावनिक सुरक्षा
  • आर्थिक सुरक्षा

प्रेम-संबंधी आणि सामाजिक आवश्यकता[संपादन]

सामाजिक आवश्यकतेत खालील घटक सामाविष्ट आहे:

  • कुटुंब
  • मैत्री
  • जवळीक
  • विश्वास
  • स्वीकृती
  • प्रेम आणि जिव्हाळा मिळविणे आणि देणे

आदराची आवश्यकता[संपादन]

आदर म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीचा आदर आणि कौतुक नसून, पण "स्व-सन्मान आणि इतरांकडून आदर" देखील आहे. [१४] बऱ्याच लोकांना स्थिर सन्मानाची आवश्यकता असते, याचा अर्थ वास्तविक क्षमता किंवा कर्तृत्वावर आधारलेला आहे. मास्लोने आदराच्या गरजांच्या दोन आवृत्त्या लक्षात घेतल्या. सन्मानाची "कमी" आवृत्ती म्हणजे इतरांकडून आदराची आवश्यकता आणि त्यात स्थिती, ओळख, विख्याती, प्रतिष्ठा आणि लक्ष यांची आवश्यकता सामाविष्ट असू शकते. सन्मानाची "उच्च" आवृत्ती म्हणजे स्वाभिमानाची आवश्यकता, आणि त्यात सामर्थ्य, क्षमता, [२] प्रभुत्व, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि स्वातंत्र्य यांचा सामावेश असू शकतो. ही "उच्च" आवृत्ती मार्गदर्शक तत्त्वे घेते, "अधिश्रेणी तीव्रपणे विभक्त करण्याऐवजी एकमेकांशी संबंधित आहेत". [१५] याचा अर्थ असा की आदर आणि त्यानंतरच्या पातळी काटेकोरपणे वेगळे केलेले नाहीत; त्यास्थानी, पातळी एकमेकांची संबंधित आहेत.

टीका[संपादन]

मास्लोच्या आवश्यकता अधिश्रेणीचा प्रबोधिकेच्या बाहेर व्यापक प्रभाव आहे, कदाचित ते अशा गोष्टींचे स्पष्टीकरण देते कारण "बहुतेक मानव स्वतःला आणि इतरांना लगेच ओळखतात". [१६] तरीही, शैक्षणिकदृष्ट्या, मास्लोच्या कल्पनेला अत्यर्थ विरोध केला जातो. जरी अलीकडील संशोधन सार्वत्रिक मानवी गरजा, तसेच लोक ज्या प्रकारे आवश्यकता शोधतात आणि त्यांची पूर्तता करतात त्या मार्गाचे सामायिक क्रम प्रमाणित करत असल्याचे दिसून येत असले तरी, मास्लोने प्रस्तावित केलेल्या अचूक अधिश्रेणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. [१०] [११] सर्वात सामान्य टीका ही अशी अपेक्षा आहे की भिन्न व्यक्ती, साम्य पार्श्वभूमी असलेल्या आणि त्यांच्या संबंधित जीवनातील साम्य टप्प्यावर, समान परिस्थितीचा सामोरे जाताना, साम्य निर्णय घेतील. त्याऐवजी, एक सामान्य निरीक्षण असे आहे की मानव प्रेरणांच्या विलक्षण संचाद्वारे चालविला जातो आणि त्यांच्या वागणुकीचा मास्लोव्हीय तत्त्वांवर आधारित विश्वासार्हपणे अनुमान लावला जाऊ शकत नाही. दुसरी टीका अशी आहे की लोक फक्त या प्रसूचीवर जातील जेव्हा बहुतेक वेळा लोक या प्रसूचीच्या वर आणि खाली जात असतात.

  1. ^ a b Maslow 1943.
  2. ^ a b c Deckers, Lambert (2018). Motivation: Biological, Psychological, and Environmental. Routledge Press. ISBN 9781138036338.
  3. ^ Kaufman, Scott Barry; Bridgman, Todd; Cummings, Stephen; Ballard, John (19 April 2019). "Who Created Maslow's Iconic Pyramid?". Scientific American Blog Network. New York City: Springer Nature America. ISSN 0036-8733. Archived from the original on May 8, 2019. The claim that Maslow stole the idea for his pyramid from the Blackfoot has gained attention on social media, but if Maslow did not create the pyramid, he could not have taken it from the Blackfoot. There is no doubt that Maslow's fieldwork with the Blackfoot was insightful for him. He discussed his observations with the Blackfoot briefly in his 1954 book. Maslow's biographer, Ed Hoffman, devoted an entire chapter to Maslow's fieldwork. While Maslow learned much about these proud people, there is nothing in these writings to suggest he borrowed or stole ideas for his hierarchy of needs.
  4. ^ Bridgman, Todd; Cummings, Stephen; Ballard, John (March 2019). "Who Built Maslow's Pyramid? A History of the Creation of Management Studies' Most Famous Symbol and Its Implications for Management Education". Academy of Management Learning & Education. 18 (1): 81–98. doi:10.5465/amle.2017.0351. ISSN 1537-260X.
  5. ^ Poston, Bob (August 2009). "An Exercise in Personal Exploration: Maslow's Hierarchy of Needs" (PDF). The Surgical Technologist. Association of Surgical Technologists. 308: 348.
  6. ^ Kremer, William; Hammond, Claudia (August 31, 2013). "Abraham Maslow and the pyramid that beguiled business". World Service. BBC News Magazine. Archived from the original on July 16, 2018. September 1, 2013 रोजी पाहिले. Abraham Maslow and the Hierarchy of Needs was broadcast on Mind Changers on Radio 4 and Health Check on the BBC World Service
  7. ^ Freitas, Frances Anne; Leonard, Lora J. (January 2011). "Maslow's hierarchy of needs and student academic success". Teaching and Learning in Nursing. 6 (1): 9–13. doi:10.1016/j.teln.2010.07.004. ISSN 1557-3087.
  8. ^ Lester, David (August 2013). "Measuring Maslow's Hierarchy of Needs". Psychological Reports. 113 (1): 15–17. doi:10.2466/02.20.pr0.113x16z1. ISSN 0033-2941. PMID 24340796.
  9. ^ Empty citation (सहाय्य)
  10. ^ a b Villarica, H. (August 17, 2011). "Maslow 2.0: A new and improved recipe for happiness". The Atlantic. Archived from the original on November 21, 2011. March 9, 2017 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":3" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  11. ^ a b Tay, L.; Diener, E. (2011). "Needs and subjective well-being around the world". Journal of Personality and Social Psychology. 101 (2): 354–365. doi:10.1037/a0023779. PMID 21688922. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":4" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  12. ^ a b McLeod, Saul (December 29, 2021). "Maslow's Hierarchy of Needs". January 2, 2022 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  13. ^ Goble, Frank G. (1971). The third force: the psychology of Abraham Maslow. Richmond, CA: Maurice Bassett Publishing. p. 62. ISBN 0671421743.
  14. ^ Dodge, Diane Trister; Colker, Laura J.; Heroman, Cate (2002). "Theory and Research Behind The Creative Curriculum". The Creative Curriculum for Preschool (PDF) (4th ed.). Washington, DC: Teaching Strategies. pp. 2–3. ISBN 978-1879537439. Archived from the original (PDF) on January 10, 2020 – Jeanette Fanconi, Modesto Junior College द्वारे.
  15. ^ Maslow, A (1954). Motivation and personality. New York, NY: Harper. ISBN 978-0-06-041987-5.
  16. ^ Abulof, Uriel (December 1, 2017). "Introduction: Why We Need Maslow in the Twenty-First Century". Society (इंग्रजी भाषेत). 54 (6): 508–509. doi:10.1007/s12115-017-0198-6. ISSN 0147-2011.