मारिओ मिरांडा
मारिओ मिरांडा | |
पूर्ण नाव | मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा |
जन्म | इ.स. १९२६ दमण, पोर्तुगीज भारत |
मृत्यू | डिसेंबर ११, इ.स. २०११ लोटली, गोवा |
राष्ट्रीयत्व | कोंकणी, भारतीय |
कार्यक्षेत्र | हास्यचित्रकला |
पुरस्कार | पद्मश्री इ.स. १९८८, पद्मभूषण इ.स. २००२, पद्मविभूषणइ.स. २०१२ |
पत्नी | हबीबा |
अपत्ये | राउल, रिशाद |
मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा (रोमन लिपी, पोर्तुगीज: Mario João Carlos do Rosario de Brit de Miranda), अर्थात मारिओ मिरांडा (मराठी लेखनभेद: मारिओ द मिरांडा ; रोमन लिपी: Mario Miranda) (इ.स. १९२६; दमण, पोर्तुगीज भारत - ११ डिसेंबर, इ.स. २०११; लोटली, गोवा) हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्री व इ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचित्रकलेतील यांचे योगदान गौरवण्यात आले.
मिरांडा यांची हास्यचित्रे टाइम्स ऑफ इंडिया तसेच मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या हास्यचित्रांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.
जीवन
[संपादन]मारिओ मिरांडा याचा जन्म मूळच्या गौड सारस्वत ब्राह्मण, परंतु पुढे रोमन कॅथलिक बनलेल्या गोवेकर घराण्यात इ.स. १९२६ साली दमण येथे झाला [१]. इ.स. १७५० च्या सुमारास रोमन कॅथॉलिक धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पूर्वज सरदेसाई आडनाव लावत असत[२].
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "मारिओज वर्ल्ड (मारिओचे जग)" (इंग्लिश भाषेत). १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "मिरांडा हाउस - लोटली (मिरांडा सदन - लोटली)" (इंग्लिश भाषेत). 2011-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)