Jump to content

मारिओ मिरांडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारिओ मिरांडा

पूर्ण नावमारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा
जन्म इ.स. १९२६
दमण, पोर्तुगीज भारत
मृत्यू डिसेंबर ११, इ.स. २०११
लोटली, गोवा
राष्ट्रीयत्व कोंकणी, भारतीय
कार्यक्षेत्र हास्यचित्रकला
पुरस्कार पद्मश्री इ.स. १९८८,
पद्मभूषण इ.स. २००२, पद्मविभूषणइ.स. २०१२
पत्नी हबीबा
अपत्ये राउल, रिशाद

मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा (रोमन लिपी, पोर्तुगीज: Mario João Carlos do Rosario de Brit de Miranda), अर्थात मारिओ मिरांडा (मराठी लेखनभेद: मारिओ द मिरांडा ; रोमन लिपी: Mario Miranda) (इ.स. १९२६; दमण, पोर्तुगीज भारत - ११ डिसेंबर, इ.स. २०११; लोटली, गोवा) हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्रीइ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचित्रकलेतील यांचे योगदान गौरवण्यात आले.

मिरांडा यांची हास्यचित्रे टाइम्स ऑफ इंडिया तसेच मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या हास्यचित्रांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

जीवन

[संपादन]

मारिओ मिरांडा याचा जन्म मूळच्या गौड सारस्वत ब्राह्मण, परंतु पुढे रोमन कॅथलिक बनलेल्या गोवेकर घराण्यात इ.स. १९२६ साली दमण येथे झाला []. इ.स. १७५० च्या सुमारास रोमन कॅथॉलिक धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पूर्वज सरदेसाई आडनाव लावत असत[].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ "मारिओज वर्ल्ड (मारिओचे जग)" (इंग्लिश भाषेत). १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "मिरांडा हाउस - लोटली (मिरांडा सदन - लोटली)" (इंग्लिश भाषेत). 2011-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]