Jump to content

मायबोली साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ले मायबोली साहित्य संमेलन

[संपादन]

मुखेड येथे एक मायबोली साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ.विठ्ठल वाघ होते. हे संमेलन बहुधा २०१० साली झाले असावे.

२रे मायबोली साहित्य संमेलन

[संपादन]

२रे अखिल भारतीय मायबोली साहित्य संमेलन अकोला येथील कृषी विद्यापीठ परिसरात, १५-१६ जून २०१३ या काळात झाले. संमेलनात कथाकथन, भीमराव पांचाळे यांची मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रम होते. संमेलनाचे उद्‌घाटन नागनाथ कोतापल्ले यांनी केले. मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे, बारोमासकार सदानंद देशमुख आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या उपस्थितीतल्या या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मांदियाळीमुळे आगळा दिमाख प्राप्त झाला होता.

मान्सूनच्या पदार्पणातच पूरपरिस्थिती उद्भवली असतानाही या संमेलनाला चांगला प्रतिसाद लाभला होता. घोड्यंसह असलेली ग्रंथदिंडी आणि अध्यक्षांची हत्तीवरून मिरवणूक हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोत्तापल्ले सर हत्तीवर बसले आणि त्याचवेळी पाऊस सुरू झाला. त्यावर सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिलदारपणे स्वतः भिजत सरांच्या डोक्यावर छत्री धरली. भर पावसातही संमेलनातल्या विविध परिसंवादांना, मुलाखतीच्या कार्यक्रमांना आणि काव्यवाचनाला रसिक श्रोत्यांनी तुडुंब गर्दीत हजेरी लावली. मायबोली प्रतिष्ठानचे गजानन डामरे, अ‍ॅड. अनंत खेळकर आणि डेबू सिनेमामुळे नावाजलेले प्रा. नीलेश जळमकर यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली होती.

या संमेलानाला अध्यक्ष नव्हते.

मराठी साहित्य संमेलने