Jump to content

मादाम द सेव्हीन्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मादाम द सेव्हीन्ये
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वफ्रान्स संपादन
स्थानिक भाषेतील नावMarie de Rabutin-Chantal, marquise de Sévigné संपादन
जन्म-नावMarie de Rabutin-Chantal संपादन
दिलेले नावMarie संपादन
आडनावde Rabutin-Chantal संपादन
उपनावMadame de Sévigné संपादन
जन्म तारीख५ फेब्रुवारी 1626 संपादन
जन्मस्थानपॅरिस संपादन
मृत्यू तारीख१७ एप्रिल 1696 संपादन
मृत्यूस्थानGrignan संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणदेवी संपादन
चिरविश्रांतीस्थानÉglise Collégiale de Saint-Sauver-de-Grignan संपादन
वडीलCelse-Bénigne de Rabutin संपादन
आईMarie de Coulanges संपादन
वैवाहिक जोडीदारHenri de Sévigné संपादन
अपत्यFrançoise-Marguerite de Sévigné, Charles de Sévigné संपादन
नातेवाईकPauline de Simiane संपादन
Significant personPauline de Simiane संपादन
मातृभाषाफ्रेंच भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाफ्रेंच भाषा संपादन
लेखनाची भाषाफ्रेंच भाषा संपादन
व्यवसायcorrespondent, लेखक, तत्वज्ञानी संपादन
Participant inLa Société du Samedi संपादन
चळवळClassicism संपादन
Depicted byLa marquise de Sévigné संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

मादाम द सेव्हिन्ये तथा मार्क्विस दे मारी द राब्यूतॅं-शांताल (५ फेब्रुवारी, १६२६;पॅरिस१७ एप्रिल, १६९६) या फ्रेंच लेखिका होत्या. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये एका बर्गंडीच्या सरदार घराण्यात. वयाच्या सहाव्या वर्षी त्या अनाथ झाली. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकाने केला. चांगल्या शिक्षकांकडून उत्तम शिक्षण तिला मिळालेले होते. १६४४ मध्ये तिचा विवाह आंरी द सेव्हीन्ये ह्या सरदार घराण्यातील व्यक्तीशी झाला. १६५१ मध्ये एका द्वंद्वयुद्धात तिचा हा पती मारला गेला.

त्याच्यापासून तिला दोन मुले झाली होती. त्यांपैकी फ्रांस्वाझ मार्गरीत ह्या कन्येचा विवाह प्रॉव्हांसचा लेफ्टनंट जनरल काँत द ग्रिन्यॉ याच्याशी झाला आणि ती तेथे निघून गेली.

त्यानंतर मादाम सेव्हीन्येला असह्य एकाकीपण जाणवू लागले. त्यापासून काही दिलासा मिळावा म्हणून तिने आपल्या मुलीला पत्रे लिहावयास आरंभ केला. अशी १७०० पत्रे तिने लिहिली. ह्या पत्रलेखनामागे कोणतीही वाङ्मयीन आकांक्षा नव्हती पण उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या त्या पत्रांतून तिच्यात लपलेली एक लेखिका सहजपणे प्रकट झाली. तिच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील घटना, तिला भेटलेल्या व्यक्ती, तिच्या भोवतालच्या उच्चभ्रू फ्रेंच समाजात घडत असलेल्या घटना ह्यांचा तसेच तत्कालीन विषयांवरील व घटनांवरील तिचे भाष्य त्या पत्रांत आढळून येते. हे सर्व सांगण्याची तिची शैली, तिच्यातील संभाषणात्मक सूर तिच्या पत्रातील आशय विलक्षण जिवंतपणाने पुढे आणतो. त्यामुळेच ही पत्रे अविस्मरणीय ठरली. ग्रिग्नन येथे ती निधन पावली.

संदर्भ

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत