माजगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माजगांवचा मारुती

माजगांव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले मारुती मंदिर आहे. हे गाव पुणे-बंगळूर महामार्गावर आहे. चाफळपासून उंब्रजला जाताना २.५ किमी अंतरावर माजगाव आहे, या गावच्या वेशीवर एक मोठा धोंडा होता ह्याचीच गावकरी मारुती म्हणून पूजा करीत असत. एकदा गावकऱ्यांनी तो मारुती समर्थांना दाखविला व आपल्या पवित्र हातांनी ह्याची स्थापना व्हावी अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेऊन तिथे मारुतीची स्थापना केली. हे मंदिर अतिशय साधे आहे व याचा विकास होणे आवश्यक आहे.