माघरेब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माघरेब देशांचे आफ्रिकेमधील स्थान

माघरेब (अरबी: المغرب) हा उत्तर आफ्रिकेमधील एक भौगोलिक प्रदेश आहे. माघरेबमध्ये इजिप्तच्या पश्चिमेकडील बराचसा किंवा सर्व भूभाग समाविष्ट केला जातो. लिबिया, अल्जिरिया, ट्युनिसिया, मोरोक्कोमॉरिटानिया हे माघरेब देश मानले जातात. ॲटलास पर्वतरांगसहारा वाळवंटाचा काही भाग तसेच पश्चिम सहारा हा वादग्रस्त प्रदेश देखील माघरेबमध्ये गणला जातो. माघरेबच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर वायव्येस अटलांटिक महासागर आहेत.

सुमारे १० कोटी लोकसंख्या असलेल्या माघरेब भागातील बहुसंख्य लोक सुन्नी इस्लाम धर्माचे आहेत.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत