Jump to content

मांडोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?' मंदोशी
मंदोशी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजगुरुनगर (खेड)
जिल्हा पुणे जिल्हा
लोकसंख्या ९८२ (२०११)
भाषा मराठी
सरपंच सौ.कल्पना खंडू लांघी, उपसरपंच श्री. एकनाथ देवराम तळपे
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 410512
• +०२३२
• एमएच/14

मंदोशी :-

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.

राजगुरुनग पासून मंदोशी हे अंतर 50 कि.मी. इतके आहे. मंदोशी हे गाव, मंदोशी तळपेवस्ती (गावठाण), तर मोहन वाडी, हुरसाळेवाडी, रोकडे वस्ती, जावळेवाडी व केळेवाडी या वाड्या वस्ती मिळून मंदोशी गाव बनलेला आहे. मदोशी गावात तळपे, जढर,आंबवणे, उगले, सुतार, मसळे, बांगर आडनावाचे लोक राहतात.मोहन वाडी येथे मोहन, वाघमारे, बारवेकर, बांगर,केदारी, मराठे या आडनावाचे लोक राहतात. रोकडे वस्ती येथे रोकडे, पाटोळे, या आडनावाचे लोक राहतात. जावळेवाडी येथे गवारी, गोडे, कारभळ, मिलखे,तीटकारे, मोसे,तळपे,लोहकरे,मोरमारे, बुरुड,बेंढारी या आडनावाचे लोक राहतात.हुरसाळेवाडी येथे हुरसाळे,वाळुंज,आंबवणे,आंबेकर थरकुडे या आडनावाची लोक राहतात. ग्रामीण संस्कृतीवर लेखन करणारे रामदास तळपे हे याच गावचे आहेत.

लोक जीवन

मंदोशी गावात आदिवासी समाज व मराठा समाज असे दोनही समाज गुण्या गोविंदाने राहतात . धार्मिक व सामाजिक कार्यात हे दोन्ही समाज अग्रेसर असतात. मंदोशी गावात सर्व उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम सर्व लोक एकत्र मिळून करतात.

व्यवसाय व उपजीविका :-

मंदोशी गावच्या लोकांचा शेती व पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे जंगलात जाऊन हिरडा गोळा करणे, मध गोळा करणे, आंबे व करवंदे आणि जांभळे विकून आपली उपजीविका करतात. मंजुशी गावचा भूभाग हा जंगलाने व्यापलेला आहे. आंबा, जांभूळ, हिरडा, पळस, उंबर, पळस, ही मोठी झाडे आढळतात. तर करवंदे, आंबेळी, तोरणे ही झाडे सुद्धा आढळतात. यामधून लोक आपली उपजीविका भागवतात.

मंदोशी गावच्या भागात मोठ्या प्रमाणात भात शेती आहे. येथे जीर, आंबेमोहोर, खडक्या, कॉलम, इंद्रायणी, फुले समृद्धी, रायभोग इत्यादी भाताचे उत्पादन होते. काही लोक भात विकून पैसे मिळवतात. त्याचप्रमाणे नाचणीचे सुद्धा काही शेतकरी पीक घेतात.

मंदोशी गावचे धबधबे महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

अनेक शेतकरी गाई व म्हशी, बैल, गावरान कोंबड्या पाळतात. त्यामधून सुद्धा शेतकऱ्यांना ठराविक उत्पन्न मिळते. परंतु आता आधुनिक सामग्री उपलब्ध असल्यामुळे लोक बैला ऐवजी शेतीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतात.

शाळा :-

मंदोशी गावात सातवी पर्यंत शाळा आहे. आणि अंगणवाडी सुद्धा आहे.

धार्मिक ठिकाण:-

मंदोशी गावात श्री काळभैरवनाथ मंदिर असून ते गावचे ग्रामदैवत आहे. चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा भरते. या यात्रेला हार तुरे, देवाचा अभिषेक, दंडवते, पालखी, इत्यादी धार्मिक कार्यक्रम केले जातात. पालखीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आकाशातील फटाके फोडले जातात. हे दृश्य खूप नयनरमय आणि बघण्यासारखे असते. रात्री येथे तमाशाचा कार्यक्रम होतो. तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा करतात. तत्पूर्वी समाजासाठी आमटी भात हे जेवण असते. मंदोशी येथील खास आमटी भात खाण्यासाठी लांब लांबून लोक येतात. येथील कुस्त्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे खूप लांब लांबून पैलवान मंडळी येत असतात.

श्री काळभैरवनाथ मंदिरा शेजारी मारुती मंदिर, कळमजाई मंदिर, मुक्तार मंदिर, व ही मंदिर आहेत. श्री काळभैरवनाथ देव हे अतिशय जागृत देवस्थान आहे. त्यामुळे दर रविवारी देवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात.

पर्यटन:-

पर्यटनाच्या बाबतीत मंदोशी हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदोशी येथून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे अंतर 21 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे भीमाशंकर ला जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी असते. जुलै ऑगस्टमध्ये येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील ओढे नाले, धबधबे, तुडंब भरून वाहू लागतात. शिवरात हिरवीगार भात शेतीव हिरवेगार डोंगर आणि त्यामधून वाहत असलेले धबधबे, ओढे नाले. हे दृश्य स्वर्गीय आनंदाची ग्वाही देते. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.


भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.

लोकजीवन

[संपादन]

मंदोशी गावात आदिवासी हा महादेव कोळी समाज व मराठा समाज असे दोनही समाज गुण्या गोविंदाने राहतात.धार्मिक व सामाजिक कार्यात हे दोन्ही समाज अग्रेसर असतात. मंदोशी गावात सर्व उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम सर्व लोक एकत्र मिळून करतात.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, त्यामुळे नदी नाले, ओसंडून वाहू लागतात. मंजू शेगावचे धबधबे हे फारच प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे हिरवीगार शेती, सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा हे पाहण्यासाठी पर्यटक खूप लांबून येत असतात.

मंदोशी गावापासूनच 21 किलोमीटर अंतरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर एक तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.

मंदोशी गावचा घाट रस्ता, हिरवेगार डोंगर व जंगल, ओसंडून वाहत असलेले धबधबे, हिरवेगार शिवार, आणि प्रसिद्ध असलेले धबधबे. इत्यादी पाहण्यासाठी पावसाळ्यात खूप लोक येतात.

नागरी सुविधा

[संपादन]

मंदोशी गाव हे तालुक्याचे गाव असलेल्या राजगुरुनगर या शहराला जोडलेले आहे. मंदोशी गावात डांबरी रस्ते, अंगणवाडी व सातवीपर्यंत शाळा आहे. नागरी सुविधा अजून म्हणाव्या तशा नाहीत.

जवळपासची गावे

[संपादन]

शिरगाव, मोरोशी,टोकवडे धुओली आणि तळेघर ही गावे आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate