Jump to content

मांगरूळ (शिराळा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मांगरूळ

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर शिराळा
जिल्हा सांगली जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

मांगरूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

मांगरूळ हे गाव शिराळ्याच्या पश्चिमेस राज्य मार्ग क्र. 111 वर शिराळा ते कोकरूड दरम्यान शिराळा येथून 13 किमी अंतरावर आहे.

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सविनय कायदेभंग चळवळीत बिळाशी येथे 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात 5 सप्टेंबर 1930 रोजी मांगरूळचे धोंडी संतू कुंभार आणि शंकर उर्फ सिताराम भाऊ चांभार हे दोन जण हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ मांगरूळ गावात हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. 5 सप्टेंबर 1930 रोजी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात दोन हुतात्म्यांचे सहकारी सत्याग्रही ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायाच्या मांडीस गोळी लागली होती.

गावात दरवर्षी चैत्र शुक्ल द्वितीयेस चिंचेश्वर (चिंतामणी, चिचूबा) मंदिर येथे दोन दिवसांची यात्रा असते. यावेळेस पंचक्रोशीतील तसेच इचलकरंजी वगैरे ठिकाणांबरोबरच गावातून मुंबई व इतर शहरांत कामानिमित्त गेलेल्या भाविकांची मोठी गर्दी असते.

दि. 1 डिसेंबर 2009 रोजी मांगरूळ गावातील नालंदा बुद्ध विहार येथे गावातील पोलीस उपअधीक्षक दीपक ज्ञानदेव कांबळे यांनी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी नालंदा अभ्यास केंद्र सुरू केले. येथे समृद्ध ग्रंथालय, मुलांबरोबरच मुलींसाठीही विशेष अभ्यासिका उपलब्ध आहे. संपूर्णपणे मोफत असलेला आणि विद्यार्थ्यानी स्वतःच संचलित केलेला हा अभिनव उपक्रम आहे.

नालंदा अभ्यास केंद्र, मांगरूळ येथून अमर मानसिंग मोहिते (AVP/DySP), अभिजित वसंत कुंभार (उपशिक्षणाधिकारी) यांची राज्यसेवेत निवड झाली आहे. 11 जून 2022 रोजी अभिजित वसंत कुंभार यांचा MPSC राज्यसेवा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

हुतात्मा स्मारक, चिंचेश्वर (चिंतामणी, चिचूबा) मंदिर, नालंदा अभ्यास केंद्र, मांगरूळ

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

बिळाशी कोकरूड रिळे

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate