Jump to content

महिकावती मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महिकावती उर्फ मातृकी मंदिर

हे मंदिर पालघर जिल्ह्यातल्या माहीम-शिरगाव रस्त्यावर वडराई एसटी बसथांब्यापासून अर्धा किमीवर, मातृकी खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर आहे. बसथांब्यापासून चालत आल्यास १० मिनिटात देवळात पोहोचता येते. हे देऊळ खाडीपुलावरून गेल्यावर उजवीकडील वळणावर आहे.

आख्यायिका

रावणाने सीतेला पळविल्यानंतर रामलक्ष्मण शोध घेत अही महिरावण ह्या राक्षसद्वयीच्या महिकावती साम्राज्यात आले. अही मही हे महिकावती देवीचे भक्त होते आणि त्यांनी आपला मित्र रावणाला खूष करण्यासाठी रामलक्ष्मण ह्यांना महिकावती देवीस बळी द्यावयाचे ठरवून मायावी शक्तीने त्यांना पकडले. परंतु हनुमानाने महिकावती देवीस ढकलून देऊन देवीच्या आवाजात रामलक्ष्मणांना जिवंत छपरावरून सोडण्यास सांगितले. आजही त्यामुळे महिकावती देवीची मूर्ती पडलेल्या अवस्थेत आहे. []

अहिरावणमहिरावण ह्यांचा उल्लेख महिरावणी गावामध्ये आलेला आहे.

उत्सव

आश्विन महिन्यात नवरात्रात येथे भरपूर भक्तगण दर्शनासाठी येतात.

इतर संदर्भ

[संपादन]

महिरावणी

संदर्भ

[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

  1. ^ #आशापुरी माऊली :रमाकांत पाटील. प्रकाशन २१/०९/२०१४ पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ, मु.पो.केळवे बीच, ता.जि.पालघर.४०१४०१.