मकालू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मकालू शिखर

मकालू हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.[१] हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. १५ मे इ.स. १९५५ रोजी लायोनेल टेरे व जिन कुझी यांची फ्रेंच मोहीम सर्वप्रथम या शिखरावर दाखल झाली. २०१४ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने या शिखरावर यशस्वी चढाई केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "अष्टहजारी शिखर मोहीम!". लोकसत्ता. २४ डिसेंबर २०१५. २५ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.