ब्रॉड पीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रॉड पीक हे पृथ्वीवरील १२व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. हे चीनपाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या बाल्टिस्तान परिसरामध्ये आहे. या शिखराची उंची ८०५१ मी. आहे. याला आधी के-३ या नावाने ओळखले जात असे.

काराकोरम पर्वत रांगेमध्ये, ‘माउंट के-२’ पासून अवघ्या आठ किलोमीटरवर ‘माउंट ब्रॉड पीक’ उभे आहे. या शिखराच्या माथ्याची रुंदी साधारण दीड किलोमीटर आहे. एवढ्या अवाढव्य रुंदीमुळे याचे नाव ‘ब्रॉड पीक’ असे ठेवण्यात आले आहे. ९ जून १९५७ रोजी फ्रित्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मुक, कर्ट डेमबर्गर व हरमौन बुहल यांच्या ऑस्ट्रियन गिर्यारोहक संघाने हे शिखर पहिल्यांदा सर केले.