भोंडला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भोंडल्याची गाणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नवरात्रलोकगीत

मुलींचा भोंडला

भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते.

भोंडला[संपादन]

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोट्या – मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते. कारण माहीत आहे ? त्या दिवसापासून त्यांच्या आवडत्या ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, कि त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ‘हदगा’ खेळतात. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या टीपक्यांनी त्यावर झूल काढतात. रंगबेरंगी फुलांच्या माळाघालून त्याला सजवतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रातकोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरुन छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात.[१] नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.* हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते..
भोंडल्याची गाणी-

नमन गीत- १.ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवळ घुमती गिरीजा कपारी
अंकाणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझा सोळा वर्ष

२.वहाते मी हादग्या परी हादगा देव मी पूजिते सख्यांना बोलविते हादगा देव मी पूजिते लवंगा सुपा-या वेलदोडे करून ठेविले विडे वहाते मी हाद्ग्यापुढे हादगा देव मी पूजिते [१]

३.आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
रामाचा पत्ता कुठ नाही
राम ग वेचितो कळ्या
सीता ग गुंफिते जाळ्या
या गीतात सीता ही भूमिकन्या असून धर्तीचे रूप मानले जाते तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो.[२] अशी गाणी गात शेवटी ...आडात पडला शिंपला,
आमचा भोंडला संपला!याने सांगता होते., आणि सर्प म्हणे मी ....खिरापतीला काय ग? अशी विचारणा होऊन एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते.. शेवटी गोड की तिखट? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिचा भोंडला असयचा तिला अगदी धन्य वाटते..[२]


भोंडल्याचे गीत

पारंपरिक भोंडल्याची गाणी' या पुस्तकात सौ. सुनंदा वैद्य यांनी अनेक गाणी संकलित केली आहेत. ही गाणी महाराष्ट्रभर म्हटली जात असल्याने त्यांत भरपूर पाठभेद आहेत.

संदर्भ व नोंदी[संपादन]

 • {पुस्तक} लोहिया शैला, भूमी आणि स्त्री
 • एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी


विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

अभ्यासकांचे साहित्य[संपादन]

 • भोंडला भुलाबाई (१९७७) -डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर
 • हादगा - विनया देसाई
 • शैला लोहिया -भूमी आणि स्त्री

संग्रह[संपादन]

 • असा भोंडला सुरेख बाई - इंदिरा कुलकर्णी
 • गाणी भोंडल्याची - सौ. वैजयंती केळकर
 • पारंपरिक भोंडल्याची गाणी - सौ. सुनंदा वैद्य
 • हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे


नवकाव्य[संपादन]

 • आधुनिक भोंडला गीते- उज्ज्वला सभारंजक

मूळ मजकूर विकिस्रोतवर स्थानांतरित[संपादन]

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: भोंडला हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:भोंडला येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.संदर्भ[संपादन]

 • ^ लोकसंगीत डॉ.बाबर सरोजिनी
 • ^ डॉ. लोहिया शैला , भूमी आणि स्त्री (२००२)