खर्डा (किल्ला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खर्डा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
खर्डा - अजून एक दृश्य

खर्डा (शिवपट्टण)हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेले एक ऐतिहासिक शहर बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेले शहर पण त्या काळातील अतिशय वैभवशाली आणि रणनीती च्या दृष्टीने महत्त्वाचे शहर.खर्डा शहर अहमदनगर च्या दक्षिणेला 100 km जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे.

खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी 17 व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात.गावामध्ये पुरातन गढी(राजवाडा)आहे.देखरेख अभावी तिची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.गावाच्या बाहेर दक्षिणेला  एक भुईकोट प्रकारच्या बांधणीचा किल्ला आहे.

गावच्या 2 ते 8 km च्या अंतरावर जागृत बारा जोतिर्लिंग आहेत.खर्डा शहर ही एक मोठी व्यापार पेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

11 मार्च 1795 ला याच शौर्य भूमी मध्ये मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला.सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा दैदीप्यमान विजय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवला. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने 80 हजार सैन्य होते तर निजामाचे 1लाख 30 हजार सैन्य रण भूमीमध्ये होते.या रणसंग्राममध्ये जवळपास 4 हजार सैनिक मारले गेले.गावच्या पंचक्रोशी मध्ये त्यांच्या समरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात.एवढा मोठा विजय मराठ्यांच्या या नंतर झाला नाही म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले गेले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेड च्या प्रयत्नाने येथील युद्ध भूमीवर ध्वज रोहन करून एक तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसवण्या आली.आपल्या पूर्वजांनी आठवण प्रत्येकाला व्हावी.जुलमी निजामाला मराठयानी शिकवलेला धडा प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यावा हीच या मागची भावना.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून किल्ला सुशोभीकरण करून तोफेची प्रतिकृती व ध्वजारोहण करण्यात आले.

लेख:-रुपेश खारगे RK

संदर्भ[संपादन]

महाराष्ट्राचे गॅझेटमधील मजकुर