भारतीय नाविक बंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) यामधे १८ फ़ेब्रुवारी १९४६ मध्ये जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांचा संप आणि नंतरच्या बंडाचा समावेश होतो. मुंबईमधे सुरुवात होऊन हे बंड, कराची ते कलकत्ता असे पूर्ण ब्रिटीश भारतात पसरले आणि त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधिल २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांनी सहभाग घेतला.[१][२]

हे बंड ब्रिटीश सैनिकांनी आणि शाही नैदलाच्या युद्धनौकांनी बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जाण जाखमी झाले. या संपाला फक्त साम्यवादी पक्षाने पाठिंबा दिला, तर काँग्रेस आणि मुस्लिम लिगने त्याचा निषेध केला.

नाविक दलाच्या उठावाचा इतिहास[संपादन]

18 फ़ेब्रूवारी 1946 रोजी रॉयल भारतीय नौसेनेच्या सर्वात नाविक स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या सामान्य परिस्थीतींबाबत तक्रार करत बंद पुकारला. त्या बंदाचे तात्कालिक कारण म्हणजे त्यांना मिळणारे राहाण्याच्या ठिकाणाचा आणि अन्नाचा निकृष्ट दर्जा हे होते.[३] 19 फ़ेब्रूवारीच्या पहाटेपर्यंतच ह्या बंदासाठीची केंद्रिय समिती निवडण्यात आली. केंद्रिय समितीचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ़्टनंट मोहम्मद शरिफ़ आणि पॅटी ऑफ़िसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली[४] ह्या बंदाला भारतीय जनतेमध्ये थोड्याफ़ार प्रमाणात पाठींबा मिळाला होता, परंतू बहुतांश राजकीय नेत्यांनी मात्र असा पाठींबा देण्याचे टाळले हो.[५]

बंडाचा घटनाक्रम[संपादन]

दुसऱ्या महायुद्धात रॉयल इंडियन नेव्हीचा (शाही भारतीय नौदल) मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९४५ मध्ये ते त्याच्या १९३९ मधिल संख्येच्या दहा पट मोठे होते. युद्धामुळे लष्करातील भरती लढवय्या जमतींच्या अनुषंगाने करण्यात आली नाही, तर विविध सामाजिक स्तरातील पुरुषांची भरती केली गेली. १९४२ ते १९४५ दरम्यान भारतीय साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी नाझी जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेना आणि शाही भारतीय नौदलातील मोठ्या प्रमाणवरील भरती साठी मदत केली ज्यामध्ये प्रामुख्याने साम्यवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. पण युद्ध संपल्यानंतर, नव्याने भरती झालेले लोक ब्रिटिशांविरुद्ध उठले.[६]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "Beyond Talwar: a cultural reappraisal of the 1946 Royal indian Navy Mutiny", The Journal of Imperial and Commonwealth History, Volume 43, Issue 3, 2015
  2. ^ Notes on India By Robert Bohm.pp213
  3. ^ "Mumbai and the Great Naval Mutiny". 2018-01-26 रोजी पाहिले. 
  4. ^ Encyclopaedia of Political Parties. By O.P. Ralhan pp1011 ISBN 81-7488-865-9
  5. ^ Glimpses of Indian National Movement. By Abel M. pp257.ISBN 81-7881-420-X
  6. ^ The Great Royal Indian Navy Mutiny of 1946 By Javed Iqbal