भाऊ लोखंडे
डॉ. भाऊ लोखंडे (१५ जून १९४२ – २२ सप्टेंबर २०२०[१]) हे मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते.[२]
लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते 'विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे.
गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लेखन[संपादन]
भाऊ लोखंडेंनी लिहिलेली पुस्तके:
- अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
- डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर - २०१२)
- मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
- महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित (संपादित व अनुवादित)
- रशियातील बौद्धधर्म
- सौन्दरनन्द महाकाव्यम् (सहलेखिका -रत्नमाला लोखंडे)
- डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा[३]
- बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता[३]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश, मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार[३]
संदर्भ[संपादन]
- ^ https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/dr-bhau-lokhande-passed-away-349216?amp
- ^ "डॉ. भाऊ लोखंडे यांचा १ जुलैला अमृतमहोत्सवी सत्कार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-06-27. 2018-05-08 रोजी पाहिले.
- ^ a b c "Amazon.in: Bhau Lokhande: Books". www.amazon.in. 2018-05-08 रोजी पाहिले.