ब्रायन क्रॅन्स्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रायन क्रॅन्स्टन
जन्म ७ मार्च, १९५७ (1957-03-07) (वय: ६७)
हॉलिवूड, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८० - चालू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम ब्रेकिंग बॅड

ब्रायन क्रॅन्स्टन (Bryan Cranston; ७ मार्च १९५७) हा एक अमेरिकन रंगमंच अभिनेता, पटकथाकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता आहे. ब्रेकिंग बॅड नावाच्या धारावाहिकामध्ये वॉल्टर व्हाईट ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. वॉल्टर व्हाईटच्या भूमिकेसाठी क्रॅन्स्टनला ४ वेळा सर्वोत्तम दूरचित्रवाणी अभिनेत्यासाठीचा एमी पुरस्कार तसेच एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. ह्याखेरीज झाइनफेल्ड व इतर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये देखील तो चमकला.

मोठ्या पडद्यावर देखील क्रॅन्स्टनने सेव्हिंग प्रायव्हेट रायन, आर्गो, गॉडझिला इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

बाह्य दुवे[संपादन]