बौद्ध
Appearance
(बौध्द या पानावरून पुनर्निर्देशित)
बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरू आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[१][२][३] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation". www.thedhamma.com. 2016-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.
- ^ "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04. 2022-08-25 रोजी पाहिले.
- ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2018-03-16 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |