Jump to content

बोरिस पास्तरनाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोरिस पास्तरनाक
चित्र:Ilya-ilf-pasternak-1.jpg
जन्म १० फेब्रुवारी १८९० (1890-02-10)
मॉस्को, रशियन साम्राज्य
मृत्यू ३० मे, १९६० (वय ७०)
मॉस्को, सोव्हिएत संघ
भाषा रशियन
प्रसिद्ध साहित्यकृती डॉक्टर झिवागो
पुरस्कार नोबेल पुरस्कार

बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक (रशियन: Бори́с Леони́дович Пастерна́к; १० फेब्रुवारी १८९० - ३० मे १९६०) हा एक रशियन लेखक व कवी होता. पास्तरनाकने १९१७ साली रचलेला माझी बहीण, जीवन नावाचा कवितासंग्रह रशियन साहित्यामध्ये मौल्यवान मानला जातो. पास्तरनाकने योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, फ्रीडरिश शिलर, विल्यम शेक्सपियर इत्यादी अनेक विदेशी कलावंतांनी लिहिलेली नाटके रशियन भाषेत अनुवादित केली.

१९५६ साली पास्तरनाकने डॉक्टर झिवागो नावाची एक कादंबरी लिहिली. ह्या कादंबरीचे कथानक १९०५ सालच्या रशियन क्रांतीदुसरे महायुद्ध ह्यादरम्यानच्या कालावधीमधील होते. पास्तरनाकचे समाजवादावरील स्वतंत्र विचार सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाला पटले नाहीत व सोव्हिएत सरकारने ह्या कादंबरीचे प्रकाशन करण्यास नकार दिला. डॉक्टर झिवागोचे हस्तलिखित चोरून इटलीच्या मिलान येथे आणले गेले व १९५७ साली ही कादंबरी इटलीमध्ये प्रकाशित केली गेली. ही कादंबरी रातोरात जगप्रसिद्ध झाली व १९५८ साली पास्तरनाकला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाल्याचे घोषित करण्यात आले. ह्यामुळे खवळून उठलेल्या सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास मनाई केली. ह्या बंदीनंतरही सोव्हिएत सरकारचा राग शांत झाला नाही व राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्हने पास्तरनाकची देशामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. पास्तरनाकच्या मुलाच्या मतानुसार भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांनी ख्रुश्चेव्हला ह्याची अंमलबजावणी करण्यापासून थांबवले. १९६० साली पास्तरनाकचे निधन झाले.

अखेर १९८८ साली पास्तरनाकच्या वंशजांनी नोबेल पारितोषिक स्वीकारले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
आल्बेर काम्यू
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५८
पुढील
साल्वातोरे क्वासिमोदो