बॉनी राइट
British actress and filmmaker | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Bonnie Wright | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी १७, इ.स. १९९१ लंडन Bonnie Francesca Wright | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा |
| ||
सहचर |
| ||
उल्लेखनीय कार्य | |||
| |||
बोनी फ्रान्सिस्का राइट (जन्म १७ फेब्रुवारी १९९१) [१][२] एक इंग्रजी अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पर्यावरण कार्यकर्त्या आहे. हॅरी पॉटर चित्रपट मालिकेतील जिनी विजली या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.
लंडनमध्ये जन्मलेल्या राइटने हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (२००१) आणि हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स (२००२) मध्ये तिच्या व्यावसायिक अभिनयात पदार्पण केले व हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ (२०११) या अंतिम चित्रपटापर्यंत दहा वर्षे ही भूमिका साकारली. ह्या लोकप्रिय मालिकेनंतर, राइट स्वतंत्र चित्रपटांमध्ये दिसली, ज्यात बिफोर आय स्लीप (२०१३), द सी (२०१३), आणि आफ्टर द डार्क (२०१४) या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तिने २०१३ मध्ये पीटर उस्टिनोव्हच्या द मोमेंट ऑफ ट्रुथ या नाटकात द साउथवार्क प्लेहाऊसमध्ये मुख्य भूमिकेत नाट्यकलेत पदार्पण केले.
२०१२ मध्ये लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमधून फिल्म मेकिंगमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर, राइटने तिची स्वतःची निर्मिती कंपनी, बॉनबॉनलुमियरची स्थापना केली आणि लघुपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. डेव्हिड थेवलीस अभिनीत सेपरेट वी कम, सेपरेट वी गो (२०१२) हा तिचा पहिला दिग्दर्शनाचा प्रकल्प होता, जो कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समीक्षकांनी प्रसिद्ध केला होता व किशोरवयीन विषयावर आधारीत होता. तिने नो दायसेल्फ (२०१६) चे आणि सेक्सटेंट (२०१६) दिग्दर्शन केले होते. राइटची तीन भागांची मालिका, फोन कॉल्स, २०१७ मध्ये ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रकाशीत झाली. तिने ए.एस. बायटच्या द मॅटिस स्टोरीजवर आधारित केरी फॉक्स आणि जेसन आयझॅक्स अभिनीत मेडुसाज अँकल्स (२०१८) प्रकाशीत केले. तिने सोफी लोवे, पीट योर्न आणि स्कारलेट त्योहान्सन या कलाकारांसाठी संगीत व्हिडिओ देखील दिग्दर्शित केले आहेत.
राइटला तिच्या पर्यावरणीय सक्रियतेसाठी ओळख मिळाली आहे. ती ग्रीनपीस आणि लुमोस या धर्मादाय संस्थांची राजदूत आहे.
वैयक्तिक जीवन
[संपादन]बोनी फ्रान्सिस्का राइटचा जन्म १७ फेब्रुवारी १९९१ रोजी लंडन बरो ऑफ टॉवर हॅमलेट्समध्ये झाला. ती राईट अँड टीग ज्वेलरी कंपनीचे मालक शीला टीग आणि गॅरी राइट यांचे दुसरे अपत्य आहे. तिने तिच्या माध्यमिक शिक्षणासाठी प्रायर वेस्टन प्रायमरी स्कूल आणि नंतर उत्तर लंडनमधील किंग अल्फ्रेड स्कूलमध्ये शिक्षण घेतले.[३][४] सेटवर असताना, राइटने एका ट्यूटरच्या मदतीने तिचा अभ्यास चालू ठेवला,[४] आणि कला, फोटोग्राफी आणि डिझाइन तंत्रज्ञानामध्ये तीन ए-लेव्हल्स प्राप्त केले.[४]
तिने सांगितले की सेटवर वाढल्याने तिच्या चित्रपटातील ज्ञान आणि आवड वाढली.[४] २००९ मध्ये हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोजच्या चित्रीकरणादरम्यान, तिने युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली.[४][५] २०१२ मध्ये, राइटने चित्रपट निर्मितीमध्ये कला शाखेची पदवी प्राप्त केली.[६]
राइट पेस्केटेरियनिझ (सीफूड खाणे आणि जमिनीवरील मांसाहार टाळणे) पाळते. [७] ती क्लर्कनवेल, लंडन,[८] लॉस एंजेलिस येथे राहिली आहे आणि २०२२ मध्ये सॅन डियेगो येथे स्थलांतरीत झाली आहे.[९] तिने यापूर्वी एप्रिल २०११ ते जून २०१२ या कालावधीत हॅरी पॉटरचा सह-कलाकार जेमी कॅम्पबेल बॉवरशी लग्न करणार असे सांगीतले होते.[१०] [११] [१२]
२० मार्च २०२२ रोजी, राइटने तिच्या इंस्टाग्रामवर पुष्टी केली की तिने तिच्या दीर्घकालीन प्रियकर अँड्र्यू लोकोकोशी लग्न केले आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी, राइटने उघड केले की ते त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत व १९ सप्टेंबर २०२३ रोजी तिने मुलाला जन्म दिला.[१३]
संदर्भ
[संपादन]- ^ Births, Marriages & Deaths Index of England & Wales, 1916–2005.; at ancestry.com
- ^ "Bonnie Wright Biography". Empire. 16 August 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2018 रोजी पाहिले.
- ^ Slater, Lydia (25 June 2009). "The magic of Bonnie Wright". Evening Standard. 26 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2013 रोजी पाहिले.
- ^ a b c d e Slater, Lydia (26 June 2009). "The magic of Bonnie Wright". London Evening Standard. 29 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 July 2009 रोजी पाहिले.
- ^ Riggs, Thomas (2007). Contemporary Theatre, Film & Television: A Biographical Guide. Gale Group. p. 341. ISBN 978-0-7876-9050-2.
- ^ "Bonnie Wright". HuffPost. 2021-01-12. 29 November 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-21 रोजी पाहिले.
- ^ "'Harry Potter' star Bonnie Wright on the Hogwarts snack wishes was real". Yahoo. 29 April 2022. 10 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 April 2022 रोजी पाहिले.
- ^ Butler, Susannah (21 March 2014). "Ginny Weasley grows up: Bonnie Wright interview". Evening Standard. 1 May 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bonnie Wright, Director". Into the Gloss. 9 June 2017. 21 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2021 रोजी पाहिले.
I was born in London, but I live in Los Angeles now. I don't think I chose to make the move for career purposes—in reality, I think I just wanted more space.
- ^ . (Interview).
- ^ "Harry Potter's Jamie Campbell Bower, Bonnie Wright Engaged!". US Weekly. 13 April 2011. 25 October 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2011 रोजी पाहिले.
- ^ Ewart, Paul (10 January 2017). "Harry Potter: Where are they now?". News.com.au. News Pty Limited. 25 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Harry Potter star Bonnie Wright announces birth of son Elio". Digital Spy. 2023-09-28. 25 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-11-13 रोजी पाहिले.