इन्स्टाग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Instagram logo 2016

इन्स्टाग्राम हे ऑनलाईन चित्र शेअर करण्याचे एक ॲप आहे. फेसबुक कंपनी या ॲपची मालक आहे. केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रीगर यांनी ऑक्टोबर २०१० साली याची निर्मिती केली होती. एप्रिल २०१२ मध्ये या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या १० कोटी होती आणि डिसेंबेर २०१४ ती संख्या ३० कोटी झाली. हे ॲप अँड्रॉइड, आयफोन, आयपॅड, नोकिया या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते. याला एप्रिल २०१२ फेसबुक कंपनीने १ अब्ज अमेरिकन डॉलरला विकत घेतले.

इन्स्टाग्राम टीव्ही (आयजीटीव्ही)[संपादन]

आयजीटीव्ही हे एक स्वतंत्र अॅप असुन यात स्मार्टफोन युजर ज्या पद्धतीनं संपूर्ण स्क्रीन आणि उभा (व्हर्टिकली) व्हिडिओ पाहू शकतात, इन्स्टाग्राम टीव्ही (आयजीटीव्ही) या सेवेमुळे आता इन्स्टाग्रामवर एक तासाचा व्हिडिओ अपलोड करता येऊ शकणार आहे. सामान्य व्यक्ती यात १५ सेकंद ते १० मिनिट आणि ६५० साईज एम बी पर्यंतचा व्हिडीओ अपलोड करू शकतात तर प्रसिद्ध आणि व्हेरीफाईड व्यक्ती ६० मिनिट आणि ५.४ जी बी साईज पर्यंतचा व्हिडीओ यात अपलोड करू शकतात. [१]

याअॅपचा वापर अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल वापरकर्ते करू शकतील. [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "What are the video upload requirements for IGTV? | Instagram मदत केंद्र". help.instagram.com (mr मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 
  2. ^ "इन्स्टाग्रामवर १ तासाचा व्हिडिओ अपलोड होणार-Maharashtra Times". Maharashtra Times (hi-mh मजकूर). 2018-11-02 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]