Jump to content

लघुपट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काही मिनिटांच्या माहितीपटाला किंवा चित्रपटाला लघुपट (शॉर्ट फिल्म) असे म्हणतात.


स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुपटातून करता येते. ३ ते ४ लघुपटांची एकत्र सांगड घालून एखादा सिनेमा होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमार्फत अनेक भारतीय संकल्पना-विचार जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहचू लागले आहेत.

शेअरिंग, पर्सनल एक्स्प्रेशन, टेक्नॉलॉजी या सर्वांचा उपयोग करून आपले छोटे छोटे अनुभव व्हिज्युअल माध्यमातून व्यक्त आणि शेअर करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात एक ‘शॉर्ट फिल्म’ तयार होत असते. तशी ‘शॉर्ट फिल्म’ प्रत्यक्षात बनवणे ही गोष्ट ‘डिजिटल तंत्रज्ञान आल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सोपी झाली आहे. डिजिटल माध्यमे सर्वांच्याच हाताशी सहजगत्या उपलब्ध झाल्याने शॉर्ट फिल्म अर्थात लघुपट तयार करण्याकडे तरुण कलावंतांचा ओढा वाढला. छोटासा प्रसंग, घटना घेऊन त्याची सूत्रबद्ध पटकथा तयार करायची आणि मनाजोगते सादरीकरण करायचे असे प्रयोग हौशी कलावंत करतात. या ताकदवान माध्यमाचा अभ्यास करून ही कला विकसित करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत गेली. लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाते

लघुपटांकडे संस्कारपट म्हणून बघितले जाते. लघुपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. लघुपटातून मानवी विकासाच्या टप्प्यातील वेगवेगळ्या सामाजिक समस्या व त्याची हाताळणी दाखवता येते. मात्र त्यासाठी या लघुपटाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलून त्यांना एक व्हिजन देण्याची गरज आहे. 'चेन्नई एक्सप्रेस' तसेच "धूम" सारख्या चित्रपटांना भरभरून देणारा प्रेक्षक लघुपटाकडे वळत नाही. कारण लघुपटाला करमणूक मुल्य नसून फक्त प्रबोधन मूल्य असते, अशी समजूत आहे. ह्या सर्व समजुतींना छेद द्यावा, लघुपटांच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षांने लोकांपुढे आणाव्या आणि प्रेक्षकांचे मनोरंजनातून समाज प्रबोधन घडावे यासाठी ’माय मुंबई लघुपट महोत्सवा’त दाखविले गेलेले लघुपट साम टीव्हीच्या "शोर्ट फिल्म-शो केस" ह्या कार्यक्रमात ’युनिव्हर्सल मराठी’कडून दाखविले जातात. ह्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दर रविवारी सकाळी ११ वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री ११:३० वाजता होत असते. माहितीपटांसाठी व्यासपीठ ठरलेला डॉक्युमेंट्री शोकेस हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ५:३० वाजता आणि रात्री ११ वाजता प्रक्षेपित केला जातो. अभिनयाशी कोणताही संबंध नसलेला "सुज्ञ" रसिक प्रेक्षक घडायचा असेल तर असा कार्यक्रम होणे ही केवळ गरज नाही तर ती सांस्कृतिक तहान आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ही भाषिक ओळ पुसून तो एक भावनिक आविष्कार करण्याची ताकद अशा कार्यक्रमात असते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांच्यापासून ते एका सिनेमाच्या निमित्ताने जी माणसे आपलं सर्वस्व पणाला लावून एखादा सिनेमा प्रेक्षकांसमोर ठेवतात तो जर रसिकतेने पाहिलाच गेला नाही तर त्याचा अर्थ पोहोचत नाही. मानवी भावनांचा कल्लोळ ते ज्वलंत सामाजिक प्रश्न अशा भिन्न विषयांवरचे लघुपट ह्यात पहावयास मिळतील आणि चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी साठी ही भाषा, भावना, अभिव्यक्ती यांचा पूल सांधणारी नांदी ठरेल ह्यात मुळीच शंका नाही.

लघुपटांचे महोत्सव दरवर्षी साजरे होतात. त्यापैकी काही लघुपट महोत्सवांची वेब साईट खाली दिल्या आहेत. सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये लघुचित्रपट कार्यशाळा दरवर्षी आयोजित केली त्यामध्ये उत्तम दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळते <https://mmisff.com Archived 2019-11-21 at the Wayback Machine.>

www.piffindia.com