Jump to content

लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॉस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Boston Logan International Airport
आहसंवि: BOSआप्रविको: KBOSएफएए स्थळसंकेत: BOS
WMO: 72509
नकाशाs
विमानतळाचे रेखाचित्र
विमानतळाचे रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक मॅसेच्युसेट्स पोर्ट ऑथोरिटी (मासपोर्ट)
कोण्या शहरास सेवा बॉस्टन
स्थळ ईस्ट बॉस्टन
हब
समुद्रसपाटीपासून उंची २० फू / ६ मी
संकेतस्थळ मासपोर्ट.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
4L/22R ७,८६१ २,३९६ डांबरी
4R/22L १०,००५ ३,०५० डांबरी
9/27 ७,००० २,१३४ डांबरी
14/32 ५,००० १,५२४ डांबरी
15L/33R २,५५७ ७७९ डांबरी
15R/33L १०,०८३ ३,०७३ डांबरी
सांख्यिकी (२०१२)
विमान आवागमन ३,५४,८६९
प्रवासी २,९३,२५,६१७
स्रोत: एफ.ए.ए.,[] Massport.[]

जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.

लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[]

हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.

सांख्यिकी

[संपादन]

सर्वाधिक प्रवासी नेणाऱ्या विमानकंपन्या

[संपादन]
सर्वाधिक प्रवासी नेणाऱ्या विमानकंपन्या (जून २०२०-मे २०२१)[]
क्र विमानकंपनी प्रवासी हिस्सा
जेटब्लू एरवेझ ३०,७२,००० ३२.९३%
अमेरिकन एरलाइन्स १८,३८,००० १९.७०%
डेल्टा एर लाइन्स १४,२२,००० १५.२४%
युनायटेड एरलाइन्स ८,५४,००० ९.१६%
साउथवेस्ट एरलाइन्स ६,३७,००० ६.८३%
- इतर* १५,०७,००० १६.१५%

* - यात अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेसचा समावेश आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ . Retrieved February 3, 2012.
  2. ^ "विमानतळ सांख्यिकी". 2011. 2010-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 3, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.bts.gov/publications/pocket_guide_to_transportation/2008/html/table_04_07b.html
  4. ^ "MASSPORT: Logan Airport: FAQ". 2008-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-09-26 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2008-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Boston, MA: Logan International Airport (BOS)". Bureau of Transportation Statistics. June 20, 2021 रोजी पाहिले.