बावकरवाडी
?बावकरवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पंढरपूर |
विभाग | पुणे |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
तालुका/के | अक्कलकोट |
भाषा | मराठी |
भौगोलिक स्थान व परिस्थिती
[संपादन]महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बावकरवाडी नावच एक छोटंसे गाव आहे. गावातील बहुतेक लोक बावकर आडनावाचे आहेत. अडीचशे लोकांच्या वस्तीच्या या डोंगरावर वसलेल्या गावात कुरनूर (बोरी हरिणी प्रकल्प) नावाचे धरण आहे. येथे शरद ऋतूत स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.[१]
धरणाचे पाणी तुळजापूर व नळदुर्ग शहरांसाठी आरक्षित ठेवून पुरविले जाते.[२] ह्या धरणामुळे बऱ्याचशा लोकांना त्यांचे राहते घर व शेती सोडावी लागली. असे असून सुद्धा गावाला धरणाच्या पाण्याचा उपभोग घेता येत नाही. शेतांवर जाण्याचा पर्यायी मार्गही उपलब्ध नाही.[३]
हवामान
[संपादन]येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
शैक्षणिक व्यवस्था
[संपादन]ह्या गावात चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चपळगाव येथे पायी चालत जावे लागते. ह्या एकविसाव्या शतकात देखील ह्या गावाला बसची सोय नाही.
संदर्भ
[संपादन]- ^ "सोलापूरचे पक्षिवैभव - थिंक महाराष्ट्र.कॉम". थिंक महाराष्ट्र.कॉम. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ नोव्हेंबर, इ.स.२०१५ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "टंचाईसदृश परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कृती आराखडा तयार - तुळजापूर लाईव्ह.कॉम". तुळजापूर लाईव्ह.कॉम ब्लॉग. २४ नोव्हेंबर, इ.स. २०१४ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "पाणीपुरवठा मंत्र्यांच्या गावाच्या घशाला कोरड!- सकाळ दैनिक". सकाळ दैनिक. 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट, इ.स.२०११ रोजी पाहिले.
|accessdate=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)