बालु महेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालनाथन बेंजामीन महेंद्र उर्फ बालु महेंद्र (तमिळ: பாலநாதன் மகேந்திரா) (जन्मः १ जानेवारी १९४६ बाट्टीकालोआ, श्रीलंका) हे एक प्रसिद्ध तमिळ चित्रपट पटकथालेखक व छायादिग्दर्शक आहेत. त्यांचे नाव चेन्नई येथील चित्रपट सृष्टित त्यांनी आणलेल्या क्रांतीसाठी सर्वश्रृत आहे. त्यांनी तमिळ चित्रपटाला एक नवी दिशा देण्याचे मोलाचे काम केले आहे. ते पुणे येथील एफ.टि.आय.आय. ह्या संस्थेचे सुवर्ण पदक पारितोषिक विजेते स्नातक आहेत. तसेच ते लंडन विद्यापिठाचे पदवीधर आहेत.