बहाळ शिलालेख
Appearance
बहाळ शिलालेख[१] हा जळगाव जिल्ह्यातील बहाळ येथील सारजादेवीच्या मंदीरात मिळाला. या लेखाची भाषा संस्कृत असून लिपी नागरी आहे. यात उल्लेखिलेली तिथी चैत्र आद्य प्रतिपदा चित्रभानु संवत्सर अशी आहे. हा लेख यादवराजा सिंघणदेव याच्या कारकिर्दीतील आहे. या लेखाचा उद्देश सिंघणदेव याचा ज्योतिषी अनंतदेव याने द्वारजा (सारजादेवी) देवालयाचा पाया बांधला हे नमूद करण्याचा होता. या लेखाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अनंतदेव व त्याचे पूर्वज यांची माहिती दिलेली असून दुसऱ्या भागात सिंघणदेव व त्याचा पिता यांची स्तुती केलेली आहे. या लेखात पुढे जैत्रपालाने गणपतीला आंध्रप्रदेशाचा प्रमुख केल्याचा उल्लेख आहे. विवेकसिंधु ग्रंथ लिहिणारा प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंदराज हा याच जैत्रपालाच्या पदरीं होता असे म्हणले जाते.[२]
शिलालेखात आलेली व्यक्तिनामे
[संपादन]- सिंह (सिंघण) – यादव राजा
- जैत्रपाल – यादव राजा, सिंघणाचा पिता
- भिल्लम
- गणपती – जैत्रपालाने संरक्षण दिलेला आंध्र देशचा राजा
- अनंतदेव – देऊळ बांधणारा राजज्योतिषी
- महेश्वर – बांधकामासाठी आर्थिक मदत देणारा अनंतदेवाचा भाऊ
- गंगाधर – लेख लिहिणारा
- थालू – बांधकामाचा सूत्रधार
- शांडिल्य – अनंतदेवाच्या घराण्याचा मूळ पुरुष
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ किलहॉर्न. इपिग्राफिका इंडिका (इंग्रजी भाषेत). p. ११०-११३. १५ मार्च २०१४ रोजी पाहिले.
- ^ श्रीधर व्यंकटेश केतकर. यादववंश (देवगिरीचा). महाराष्ट्रीय ज्ञानकोश. १४ मार्च २०१४ रोजी पाहिले.