बद्रीनारायण बारवाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. बद्रीनारायण बारवाले 
भारतीय बियाणे उद्योगाचे पितामह
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. १९३१
मृत्यू तारीखइ.स. २०१७
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
B.R. Barwale (es); B.R. Barwale (fr); B.R. Barwale (nl); B.R. Barwale (ca); डॉ. बद्रीनारायण बारवाले (mr); B.R. Barwale (ast); B.R. Barwale (en); बद्रीनारायण रामूलाल बारवाले (hi); B.R. Barwale (sl); B.R. Barwale (ga) भारतीय बियाणे उद्योगाचे पितामह (mr); Father of the Indian seeds industry (en); فلاح هندي (ar); Indiaas agrariër (nl); agricultor indiu (1931–2017) (ast)

डॉ.बद्रीनारायण बारवाले ( २७ ऑगस्ट १९३०[१], हिंगोली, २४ जुलै २०१७ मुंबई) हे भारतीय संशोधक, उद्योजक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. कापूस या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी (महिको) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.[२]

त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times". Maharashtra Times (hi-mh मजकूर). 2018-09-26 रोजी पाहिले. 
  2. ^ सकाळ चालू घडामोडी. सकाळ पब्लिकेशन. २०१७. 
  3. ^ जुवेकर, रोहन. "डॉ. बद्रीनारायण बारवाले | Saamana (सामना)". www.saamana.com (en-US मजकूर). 2018-09-26 रोजी पाहिले. 
  4. ^ "डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times". Maharashtra Times (hi-mh मजकूर). 2018-09-26 रोजी पाहिले. 
  5. ^ "डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times". Maharashtra Times (hi-mh मजकूर). 2018-09-26 रोजी पाहिले.