बदूत मंदिर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बदूत मंदिर | |
---|---|
| |
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | चन्डी |
शहर | मालांग, पूर्व जावा. |
पूर्ण | इ.स. ७६० |
बदुत (इंडोनेशियन: Candi Badut) हे ८ व्या शतकातील हिंदू चन्डी (मंदिर), टिडार भागात स्थित आहे. हे मलंग शहराच्या केंद्रस्थानापासून सुमारे ५ किलोमीटर (३.१ मैल) पश्चिमेस आहे. ही अँडिसिट दगडी रचना डौ उपजिल्ह्यातील करंग बेसुकी गावात आहे, मालांग रेजेंसी, पूर्व जावा, इंडोनेशिया येथे आहे.[१]
पूर्व जावामध्ये त्याचे स्थान असूनही या मंदिराची शैली जुन्या चन्डी शैलीसारखी आहे. ही शैली मध्य जावामध्ये असलेल्या भागात वापरलेली दिसून येते.याची शैली मलांगजवळील सिंगोसारी आणि किडाल मंदिरांप्रमाणे आहे. अंदाजे ७६० मध्ये हे मंदिर बांधले गेले होते. हे मंदिर पूर्व जावामधील सर्वात जुने मंदिर आहे.[२]
व्युत्पत्ती
[संपादन]"बदुत" हे नाव सुचविले होते एका संस्कृत भा-द्युत शब्दावरून ज्याचा संदर्भ अगस्ती ताऱ्याशी आहे. परंतु लोकमान्यतेनुसार "बदुत" हे नाव इंडोनेशियन आणि जावा शब्दाशी जोडले गेले ज्याचा अर्थ "विदुषक" असा आहे.
इतिहास
[संपादन]इंडोनेशियन इतिहासकार पुरबटजारका याने या मंदिराला मर्जोसारी गावात सापडलेल्या डायनोयो शिलालेखाशी जोडले आहे. हा शिलालेख संस्कृतमध्ये जुनी जावा चंद्रसेंगकला (क्रोनोग्राम) लिपी वापरून लिहिलेला आहे. नयना वायू रास जे ६८२ साका किंवा ७६० सीई या वर्षाशी संबंधित आहे. यात काजुरुहान राज्याचा शासक राजा गजयान याचा उल्लेख आहे.[१] तथापि, शिलालेख आणि मंदिर यांच्यात मजबूत संबंध नसल्यामुळे, डायनोयो शिलालेखातील मंदिराचा संबंध अजूनही इतिहासकारांमध्ये चर्चेत आहे.
या मंदिराचे अवशेष १९२१ मध्ये दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याच्या रूपात सापडले होते. बदुत मंदिराच्या अस्तित्वाची माहिती देणारी पहिली व्यक्ती मॉरिन ब्रेचर होती, जी मलांगमध्ये काम करणारी डच नियंत्रक होती. डच ईस्ट इंडीजच्या पुरातत्व सेवेतील बी.डी हान यांच्या देखरेखीखाली १९२५-१९२६ मध्ये बदुत मंदिर पुनर्संचयित केले गेले. त्या वेळी केलेल्या उत्खननाच्या परिणामावरून हे ज्ञात झाले की मंदिराची इमारत पूर्णपणे कोसळली होती. या मंदिराचा पायथा वगळता इतर स्र्व भाग पडला होता.[१]
रचना
[संपादन]या मंदिराचे दार पश्चिम-वायव्य दिशेला आहे. मंदिराच्या समोर तीन अवशेष होते यात परवारा किंवा लहान पूरक मंदिरे यांची समावेश होतो. मंदिर परिसर एकेकाळी ११ X ११ मीटर आकाराच्या आयताकृती दगडी कुंपणाने वेढला होता. भिंतीची वास्तविक उंची अज्ञात आहे कारण अवशेष फक्त कुंपणाचा आधार होता. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधा पायथा. दोन मीटर उंच आयताकृती साधा पायथ्याशी कोणत्याही सजावटीशिवाय दिसून येतो.[१]
मुख्य खोलीच्या प्रवेशद्वारासमोर पायऱ्या पश्चिम बाजूला आहेत. पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाहेरील बाजूस खोदकाम आहे जे आता अखंड नाहीत, परंतु अजूनही फुलांचे नमुने आहेत जे बासरी वाजविणाऱ्या व्यक्तीच्या आकृतीभोवती आहेत. प्रवेश गर्भ गृह (आतील गाभारा) सुमारे १.५ मीटर (४.९ फूट) उंच आहे. प्रवेशद्वारावर कल मखराने सजावट केलेली आहे आणि ते खूप रुंद आहे.
गर्भ गृह सुमारे ५.५३ X ३.६७ मीटरची खोली आहे. खोलीच्या मध्यभागी एक लिंगम आणि योनी आहेत. जे एक प्रतीक आहे शिवा आणि प्रजननक्षमतेचे देखील प्रतीक मानले जाते. खोलीच्या सभोवतालच्या भिंतीवर लहान लहान कोठारे आहेत ज्यात एकेकाळी हिंदू देवतांच्या मुर्त्या असाव्यात.[१]
समकालीन समान जावा हिंदू मंदिरांच्या लेआउटच्या उदाहरणांनुसार, जसे की सांबिसारी, गेबंग आणि मेरक; दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या दोन कोनात महाकाला आणि नंदीश्वर पुतळे असतात. उत्तर भागात दुर्गा महिसासुरमर्दिनी पुतळा, पूर्व बाजुला गणेश पुतळा, आणि दक्षिणेकडील बाजूला अगस्त्य पुतळ्यासाठी जागा आहेत . मात्र, हिंदू धर्माच्या सर्व मूर्तींपैकी केवळ दुर्गा महिसासुरमर्दिनीची मूर्ती बदूत मंदिरात आहे, तर उर्वरित मूर्ती गहाळ झाल्या आहे.
त्या काळातील जावानी हिंदू मंदिराच्या सामान्य संरचनेप्रमाणेच, मंदिर तीन भागांमध्ये बांधलेले आहे. पायथ्यामध्ये पायऱ्या आहेत. शरीर जे मुख्य खोलीकडे जाणारे पोर्टल आहे ज्याच्या सभोवतालच्या भिंती आहेत आणि डोके जे सहसा टायर्ड पिरामिडच्या छताच्या संरचनेचे स्वरूप घेते. सध्या, मंदिराचा फक्त पाया आणि शरीराचे भाग बाकी आहेत, तर छताची रचना गहाळ आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e "Candi Badut (Jawa Timur) - Kepustakaan Candi". candi.perpusnas.go.id (इंडोनेशियन भाषेत). 2020-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-20 रोजी पाहिले.
- ^ Hoffman, Linda (1995-06-15). Indonesia Tuttle Travel Pack: Your Guide to Indonesia's Best Sights for Every Budget (इंग्रजी भाषेत). Tuttle Publishing. ISBN 978-1-4629-1355-8.
बाह्य दुवे
[संपादन]- (इंडोनेशियन भाषेत) कॅन्डी बदूत आणि मलंगमधील इतर मनोरंजक ठिकाणे
- (इंडोनेशियन भाषेत) CityGuide.KapanLagi.com' मधील कॅन्डी बदूत