Jump to content

बंकिम चंद्र चॅटर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बकिमचंद्र चटोपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
जन्म नाव बंकिमचंद्र यादवचंद्र चट्टोपाध्याय
जन्म २६ जून १८३८
मृत्यू ८ एप्रिल १८९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कवी, कादंबरीकार, पत्रकार, डेप्युटी मॅजिस्ट्रेट (पेशा)
प्रसिद्ध साहित्यकृती वंदे मातरम् हे गीत
प्रभावित भारतीय स्वातंत्र्यलढा
वडील यादवचंद्र चट्टोपाध्याय
आई दुर्गादेवी चट्टोपाध्याय
पत्नी राजलक्ष्मीदेवी चट्टोपाध्याय

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जन्म : २६ जून १८३८; - ८ एप्रिल १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

बंकिंमचंद्रचा मूळ पिंड लेखकाचा होता. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (इंग्रजी) (१८६४) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी.

प्रकाशित साहित्य

[संपादन]

कादंबऱ्या

[संपादन]
  • दुर्गेशनंदिनी (१८६५)
  • कपालकुंडला (१८६६)
  • मृणालिनी (१८६९)
  • विषवृक्ष (१८७३)
  • इंदिरा
  • युगलांगुरीय़
  • चंद्ररशेखर
  • राधारानी
  • आनंदमठ (१८८२)
  • कृष्णकान्तेर उइल (१८७८)
  • रजनी (१८७७)
  • Rajmohan's Wife (इंग्रजी)
  • राजसिंह (१८८२)
  • देवी चौधुरानी (१८८४)
  • सीताराम (१८८७)

वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे.

निबंध

[संपादन]
  • लोकरहस्य (१८७४)
  • विज्ञान रहस्य (१८७५)
  • कमलाकान्तेर दप्तर (१८७५)
  • विविध समालोचना (१८७६)
  • साम्य (१८७९)
  • कृष्णचरित्र (१८८६) (संक्षिप्त स्वैर मराठी अनुवाद - चारुशीला धर)
  • विविध प्रबंध (१ला खंड-१८८७, २रा खंड-१८९२)
  • धर्मतत्त्व अनुशीलन (१८८८)
  • श्रीमद्भगवद्गीता (१९०२)

पत्रकारिता

[संपादन]
  • वंगदर्शन पत्रिका (१८७२-१८७६)

योगदान

[संपादन]

देशभक्तीचा धर्म ही बंकिमचंद्रांच्या लिखाणाची प्रमुख कल्पना आहे असे श्रीअरविंद घोष यांनी म्हणले आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आणि देशभक्तीचा धर्म या दोन गोष्टी म्हणजे त्यांनी राष्ट्राला दिलेले योगदान आहे असे ते म्हणतात. बंकिमचंद्रांनी भारतीयांना भारताकडे माता या रूपात पाहण्याची दृष्टी दिली हे त्यांचे आणखी एक योगदान आहे असेही त्यांनी म्हणले आहे. आणि म्हणून बंकिंमचंद्र हे नवभारताचे प्रेरणास्रोत आणि राजकीय गुरू आहेत, असे श्रीअरविंद म्हणतात. []

पूरक वाचन

[संपादन]

ऋषी बंकिम चंद्र या नावाचा बंदे मातरम् या नियतकालिकामधील १६ एप्रिल १९०७ साली श्रीअरविंद घोष यांनी इंग्लिश भाषेत लिहिलेला लेख.



संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sri Aurobindo Ghosh (2002). THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO : Vol 06 and 07 (Bande Mataram). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department.