आनंदमठ (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आनंदमठ या पानावरून पुनर्निर्देशित)
आनंदमठ

आनंदमठ द्वितीय संस्करण, १८८३
लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी
भाषा बंगाली
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रथमावृत्ती इ.स.१८८२
विषय भारताच्या स्वातंत्र्यसाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संन्याशांचा सामूहिक लढा

आनंदमठ ही बंगाली भाषेतील कादंबरी आहे.[१] इ.स.१८८२ मधे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या काल्पनिक कादंबरीची रचना केलेली आहे.

प्रथम प्रकाशन[संपादन]

संजीवचंद्र चॅटर्जी यांच्या 'बंगदर्शन' मासिकात १८८० ते १८८२ या काळात या कादंबरीचा कथाभाग प्रकाशित होत होता.[२]

कथाभाग[संपादन]

१८ व्या शतकात झालेल्या संन्याशाच्या बंडाची पार्श्वभूमी या कथेला आहे. ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध संन्यासी एकत्र येऊन त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असा या कादंबरीचा आशय आहे. हे सन्यासी स्वतःला भारतमातेचे "संतान" म्हणजे अपत्य असे म्हणत असत.[२] हे संन्यासी जंगलातील आनंदमठ नावाच्या गुप्त ठिकाणी राहून कालीमातेची उपासना करीत आणि वंदे मातरमचा जयघोष करीत, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्व वाहिलेल्या संन्यासी समूहाची कहाणी यात वर्णन केलेली आहे. देशभक्ती आणि मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच धर्म ही योगी अरविंद यांची शिकवण या कादंबरीच्या कथाभागाचे वैशिष्ट्य आहे.[३]

चित्रपट[संपादन]

हेमन गुप्ता यांनी १९५२ साली आनंदमठ कादंबरीवर आधारित हिंदी भाषेत चित्रपट काढला. या चित्रपटातील "वंदे मातरम" हे देशभक्तिपर गीत लोकप्रिय आहे.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Chatterji, Bankim Chandra (2006-01-15). Anandamath (इंग्रजी भाषेत). Orient Paperbacks. ISBN 9788122201307.
  2. ^ a b Datta, Amaresh (1987). Encyclopaedia of Indian Literature: A-Devo (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. ISBN 9788126018031.
  3. ^ Chattopadhyay, Bankim Chandra (2017-04-29). Anandamath: Dawn Over India (इंग्रजी भाषेत). Library of Alexandria. ISBN 9781465615510.
  4. ^ "स्वतंत्रता दिवस 2018: भारत की आजादी पर बनी थी ये पहली फिल्म, कोई नहीं तोड़ सका इसका रिकॉर्ड (२.८. २०१८)".