बंकिम चंद्र चॅटर्जी
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय | |
---|---|
![]() | |
जन्म नाव | बंकिमचंद्र यादवचंद्र चट्टोपाध्याय |
जन्म | २६ जून १८३८ |
मृत्यू | ८ एप्रिल १८९४ |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र | कवी, कादंबरीकार, पत्रकार, डेप्युटी मॅजिस्ट्रेट (पेशा) |
प्रसिद्ध साहित्यकृती | वंदे मातरम् हे गीत |
प्रभावित | भारतीय स्वातंत्र्यलढा |
वडील | यादवचंद्र चट्टोपाध्याय |
आई | दुर्गादेवी चट्टोपाध्याय |
पत्नी | राजलक्ष्मीदेवी चट्टोपाध्याय |
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जन्म : २६ जून १८३८; - ८ एप्रिल १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
बंकिंमचंद्रचा मूळ पिंड लेखकाचा होता. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (इंग्रजी) (१८६४) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी.
प्रकाशित साहित्य[संपादन]
कादंबऱ्या[संपादन]
|
|
|
|
वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वाङ्मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे.
निबंध[संपादन]
|
|
पत्रकारिता[संपादन]
- वंगदर्शन पत्रिका (१८७२-१८७६)