फान रंग-थाप चम
फान रंग-थाप चम
| |
---|---|
गुणक: 11°34′N 108°59′E / 11.567°N 108.983°E | |
देश | व्हिएतनाम |
प्रांत | नन्ह थौन प्रान्त |
क्षेत्रफळ | |
• एकूण | ७९.१९ km२ (३०.५८ sq mi) |
Population (2019) | १,६७,३९४ (घनत्व: २,११४/चौ.किमी) |
हवामान | Aw |
फान रंग-थाप चम किंवा पांडुरंग हे व्हिएतनाममधील एक शहर आणि निन्ह थुएन प्रांताची राजधानी आहे. समुदायाची लोकसंख्या १६७,३९४ (२०१९) आहे.
नावाचे मूळ
[संपादन]फान रंग हा चाम भाषेतील शब्द असून, हे नाव पांडुरंग चा व्हिएतनामी उच्चार आहे. पांडुरंग अर्थात विठ्ठल. थाप चाम हे नाव, म्हणजे "चाम मंदिर/बुरुज" (हिंदू-प्रभावी मंदिर), शहराच्या पश्चिमेकडील पो क्लोंग गराई मंदिराच्या नावावर आहे.
इतिहास
[संपादन]फान रंग हे पूर्वी पांडुरंग म्हणून ओळखले जात होते. पांडुरंग ही चंपा साम्राज्याची राजधानी होती.
भूगोल
[संपादन]फान रंग-थाप चम शहर निन्ह थुआन प्रांताच्या मध्यभागी, हनोईच्या उत्तरेस १३८० किमी, हो चि मिन्ह सिटीच्या ३५० किमी पूर्व आग्नेय, न्हा ट्रांग शहराच्या १०० किमी दक्षिणेस स्थित आहे.[१]
संस्कृती
[संपादन]थाप चाम आणि फण रंग जिल्हा हे चाम संस्कृतीचे जतन करण्याचे केंद्र बनले आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग चाम लोकांनी व्यापलेला आहे जेथे त्यांच्याकडे भाताची शेते, द्राक्ष आणि पीचच्या बागा, शेळ्यांचे कळप आणि ब्राह्मण गुरे आहेत. त्यांचे बुरुज ('थाप') हे त्यांच्या राजे आणि राण्यांचे सुंदर स्मारक आहेत. व्हिएतनामच्या मध्य किनाऱ्यावर जीर्ण टॉवर असलेली अनेक चाम साइट्स आहेत आणि मो सान आणि न्हा ट्रांग येथे प्रमुख स्थळे आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Điều kiện tự nhiên -". prtc.ninhthuan.gov.vn (इंग्रजी भाषेत). 2024-01-21 रोजी पाहिले.