Jump to content

प्लांक एकके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्लॅन्क एकके या पानावरून पुनर्निर्देशित)

कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते.

प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते:

मूलभूत एकके

[संपादन]
प्लांकची मूलभूत एकके
नाव मिती सूत्र मूल्य (एस.आय. एकके)
प्लांक लांबी लांबी (L) १.६१६ २२९(३८) × १०−३५ m
प्लांक वस्तुमान वस्तुमान (M) २.१७६ ४७०(५१) × १०−८ kg
प्लांक काळ काळ (T) ५.३९१ १६(१३) × १०−४४ s
प्लांक विद्युतभार विद्युतभार (Q) १.८७५ ५४५ ९५६(४१) × १०−१८ C
प्लांक तापमान तापमान (Θ) १.४१६ ८०८(३३) × १०३२ K