Jump to content

केल्विन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केल्विन हे तापमान मोजण्याचे एकक आहे. केल्विन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिकदृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरनहाइट असलेले एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे सोईस्कर असते. केल्विन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.

तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्विनची वाढ
परंतु ० केल्विन = –२७३ अंश सेल्सियस
म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन

अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात. केल्विन = अंश सेल्सियस + २७३