प्रतीक शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रतीक प्रकाश शिंदे (१ जानेवारी, इ.स. १९९५ - ) हा एक मराठी फुटबॉल खेळाडू आहे. मुंबईतील चेंबूरच्या झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेल्या प्रतीक शिंदे यांनी वयाच्या १९व्या वर्षी फुटबॉल अकादमी काढली.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


इतिहास[संपादन]

वडील वारल्यानंतर प्रतीकची आई आणि आजी यांनी मोलकरणीची कामे करून त्याला वाढवले. चेंबूरच्या आदर्श विद्यालयात शिकत असलेला प्रतीक पहिल्यांदा आपल्या गल्लीत वयाच्या ७व्या वर्षापासून फुटबॉल खेळला. त्याच्या शाळेतील क्रीडा शिक्षकांनी त्याच्यातले कौशल्य जोखले आणि त्याला फुटबॉलच्या जुजबी प्रशिक्षणासाठी त्याच्या ११व्या वर्षी केंकरे फुटबॉल ॲकॅडमीत पाठवले. त्या क्लबसाठी खेळत असताना प्रतीकला एअर इंडियाच्या अंडर १५ संघात खेळायची ऑफर आली, पण न घेता तो अंधेरी फुटबॉल ॲकॅडमीत गेला. तेथे त्याला मलय सेनगुप्‍ता नावाचे प्रशिक्षक भेटले. मलय सेनगुप्‍ता हे राष्ट्रीय मान्यताप्राप्‍त प्रशिक्षक असून त्यांच्यावर भारताच्या अंडर १४ फुटबॉल संघाची जबाबदारी होती.

आंतरराष्ट्रीय क्रीडामंचावर आगमन[संपादन]

मलय सेनगुप्‍तांनी प्रतीक शिंदेला त्याच्यातल्या गुणवत्तेची जाणीव करून दिली आणि फुटबॉलमध्ये व्यावसायिक कारकीर्द करण्यास उत्तेजन दिले. अंधेरी फुटबॉल संघातील प्रतीकचा असामान्य खेळ पाहून सेनगुप्‍तांनी त्याची स्टेडफास्ट ॲकॅडमीच्या अंडर १४ फुटबॉल संघासाठी निवड केली आणि त्याला स्वीडनमध्ये गोथिया कप यूथ टुर्नामेन्टमध्ये भाग घ्यायला लावला. ही टुर्नामेन्ट म्हणजे फुटबॉल खेळाडूंची गुणवत्ता जोखणारी जगातली सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत ६५ देशांतल्या प्रमुख संघांतले सुमारे ४०,००० खेळाडू भाग घेतात.

प्रतीक शिंदेचा जर्मन युवा संघाविरुद्धचा खेळ भारतीय प्रसार माध्यमांनी डोक्यावर घेतला. त्यानंतर प्रतीकला डेन्मार्क आणि जर्मनीतल्या विविध वयोगटांत फुटबॉल खेळायची संधी मिळाली. त्याने केलेल्या प्रत्येक गोलवर नामवंत फुटबॉल प्रशिक्षक ब्रेन्डन केयेस यांची नजर होती.

प्रतीकला यानंतर स्पेनच्या संघातर्फे खेळायची ऑफर आली, पण खर्चासाठी कुणीही प्रायोजक पुढे न आल्याने ती संधी गमवावी लागली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी ब्रेन्डन केयेसने त्याला अमेरिकेत बोलावले. एकेकाळी प्रख्यात आयरिश खेळाडू असलेले ब्रेन्डन हे गॅल्व्हेस्टन पायरेट्स सॉकर क्लबचे मुख्य प्रशिक्षक होते. ऑलिम्पिकसाठी ते १९९६ सालापासून खेळाडू तयार करत होते. प्रतीकला अमेरिकेत बोलावले खरे, पण याही वेळेला त्याला कुणी दाता मिळाला नाही. त्याला दोनवेळा व्हिसा नाकारला गेला. संधी हातातून निसटायच्या अगदी शेवटाला बुलढाणा नागरी सहकारी संस्था पुढे आली आणि तिने प्रतीकच्या खर्चाचा मोठा वाटा उचलला

अमेरिकेत पोचल्यावर तो टेक्सास-अमेरिकेतील ब्रेन्डेन यांच्या गॅल्व्हेस्टन पायरेट्स संघात दाखल झाला, आणि ब्रेन्डन केयेस यांनी प्रतीकमधून एक गुणवान फुटबॉल खेळाडू निर्माण केला.

अखेर प्रतीकची भारतातर्फे फिफा (The Fédération Internationale de Football Association) करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आणि प्रतीक शिंदे हा परदेशातील जागतिक फुटबॉल संघाबरोबर करार करणारा पहिला सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला.

प्रतीकच्या अकादमीचा पत्ता[संपादन]

प्रतीक शिंदे Soccer Academy (PSSA), ५-६ चेंबूर गोवंडी रोड, सरस्वती सोसायटी, वैभव नगर, चेंबूर (पूर्व), मुंबई-महाराष्ट्र, ४०००७१.