वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील संस्था आहे. ही संस्था वसंतराव आचरेकर यांच्या नावाने १९८०मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. संस्थेने सातशे प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचे नाट्यगृह बांधले आहे. याचे अद्ययावतीकरण, ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन व्यवस्था आदी प्रयोजित आहेत.

ही संस्था करीत असलेली कार्ये[संपादन]

  • साहित्य-नाट्यक्षेत्राशी संबंधित मान्यवरांची व्याख्याने
  • परिसंवाद
  • बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा
  • समांतर रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग
  • शास्त्रीय गायन स्पर्धा व प्रशिक्षण, वगैरे.

हे सुद्धा पहा[संपादन]