Jump to content

पोश्टर गर्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोश्टर गर्ल
दिग्दर्शन समीर पाटील
कथा हेमंत ढोमे
पटकथा हेमंत ढोमे
प्रमुख कलाकार
संवाद हेमंत ढोमे
संकलन क्षितिजा खंडागळे
गीते क्षितिज पटवर्धन
पार्श्वगायन
वेशभूषा कल्याणी गुगळे,उमा आणि बिजू
भाषा मराठी
प्रदर्शित १२ फेब्रुवारी २०१६
एकूण उत्पन्न ८ करोड []

पोश्टर गर्ल हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून समीर पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा ही हेमंत ढोमे यांची असून याची निर्मिती चलो फिल्म बनाये आणि वायकोम १८ मोशन पिक्चर्स यांनी मिळून केली आहे.[] या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, संदीप फाटक , अक्षय टांकसाळे, सिद्धार्थ मेनन , हृषीकेश जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०१६ या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला.[]

प्रमुख भूमिका

[संपादन]

कहाणी

[संपादन]

ही कथा महाराष्ट्रातील 'टेकावडे' नावाच्या एका काल्पनिक गावाची आहे. या गावात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण इतके जास्त असते की, गेल्या १५-२० वर्षांत तिथे एकही मुलगी जन्माला आलेली नसते किंवा जगू दिली जात नाही. गावात उपवर मुलीच नसल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. शेजारच्या गावातील लोकही आपल्या मुली या गावात द्यायला तयार नसतात. अशा परिस्थितीत, रुपाली (सोनाली मनोहर कुलकर्णी) नावाची एक सुंदर आणि हुशार मुलगी गावात येते. तिला पाहताच गावातील पाच मुख्य उमेदवार तिच्याशी लग्न करण्यासाठी धडपड करू लागतात. रुपाली या पाच जणांपैकी एकाची निवड करण्यासाठी त्यांना काही अटी घालते. या अटींच्या माध्यमातून ती गावातील सामाजिक प्रश्न, शेती आणि व्यसनाधीनता यांसारख्या मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधते.

गाणी

[संपादन]
अनुक्रमनावगीतकारसंगीतगायककालावधी
आवाज वाढवं डीजे[]क्षितिज पटवर्धनअमितराज[]आनंद शिंदे आदर्श शिंदे४.१६
सिम्पल डिंपल[]क्षितिज पटवर्धनअमितराजहर्षवर्धन वावरे३.५५
कशाला लावतो[]गुरू ठाकुरअमितराज[]अमितराजबेला शेंडे३.५८
रखुमाई[]वैभव जोशीअमितराजमृण्मयी दडके, कस्तुरी वावरे,प्रगती जोशी, रसिका गानू आणि पल्लवी तेलंगावकर४.५३[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. कमाई
  2. "पोश्टरगर्ल". 2016-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-01 रोजी पाहिले.
  3. "Poshter GirlUA". The Times of India. ISSN 0971-8257. 2023-03-10 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 4 "Poshter Girl". 18 April 2016 रोजी पाहिले.
  5. Atulka, Preeti (7 October 2015). "Amit Raj has composed music of Poshter Girl". Times of India. 27 January 2016 रोजी पाहिले.
  6. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/Amit-Raj-has-composed-music-of-Poshter-Girl/articleshow/49254240.cms
  7. "Rakumai". 18 April 2016 रोजी पाहिले.