पेनेलोपी क्रुझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेनेलोपी क्रुझ सांचेझ (२८ एप्रिल, १९७४:माद्रिद, स्पेन - ) ही स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने इंग्लिश चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. क्रुझला व्हिकी क्रिस्टिना बार्सेलोना चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. याशिवाय तिला गोल्डन ग्लोबसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

क्रुझला वयाच्या १५व्या वर्षी जाहिरातींतून कामे करण्याची संधी मिळाली व १६व्या वर्षापासून तिने दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला तर १७व्या वर्षी चित्रपटांत पदार्पण केले. क्रुझने व्हॅनिला स्काय, गॉथिका, इ. चित्रपटांत कामे केली आहेत.