पेठा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेठा

पेठा हा खाद्यपदार्थ आहे. कोहळ्यापासून तयार करण्यात येणारी ही मिठाई बनविण्याची सुरुवात आग्र्यातून झाली.

आख्यायिका[संपादन]

आख्यायिका १[संपादन]

मुगल सम्राट शहाजहानने आपली बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधण्यायसाठी हजारो मजूरांना त्या कामावर लावले. या मजुरांच्या रोजच्या आहारात डाळ, भात, रोटी सब्जीच असायची. ते खाऊन कंटाळलेल्या मजुरांनी तशी तक्रार केली. शहाजहानने त्याबद्दल एका पीराला आपली समस्या सांगितली. पीराने ध्यान लावले. समाधी अवस्थेत असताना त्याला पेठ्याची पाककृती गवसली. त्यानंतर जवळपास ५०० खानसाम्यांनी मजुरांसाठी पेठा बनवला.

आख्यायिका २[संपादन]

शहाजहानने मुमताज महलसाठी बांधविलेला ताजमहाल प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्याने त्या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या खानसाम्यास अशी मिठाई बनवण्याचा आदेश दिला जी त्या संगमरवरी ताजमहालसारखीच शुभ्र, पवित्र असेल. त्यातून पेठ्याची निर्मिती झाली.

पाककृती[संपादन]

साखरेचा पाक आणि कोहळा (म्हणजे हिंदीत पेठा) यांच्या मिश्रणातून ही पाककृती बनते. मुळात संगमरवरी दगडासारखी पांढरी शुभ्र असलेली ही गोडगट्ट मिठाई हल्ली केवड्याच्या वासाने सुगंधी केलेली आणि विविध रंगांनी रंगवून विकली जाते.

पंछी पेठा[संपादन]

लोणावळ्याच्या मगनलाल चिक्की प्रमाणे आग्ऱ्याला भारतीय प्रमाणन दाखला मिळालेला (ISO Certified) पंछी पेठा प्रसिद्ध आहे.