पिंपळगाव (बसवंत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिंपळगाव (बसवंत) हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर पराशरी नदीच्या काठावरील एक मध्यम शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे.येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जवळचं तालुक्याचे ठिकाण निफाड शहर आहे. तसेच मिग विमानांचा कारखाना असलेले ओझर देखील येथून जवळच आहे. मुंबई-आग्रा महामार्गा वरील ह्या शहरास व्यापारी महत्त्व आहे.

पिंपळगाव बाजार समिती पिंपळगाव हि बाजार समिती नवीन स्थापनेपुर्वी सुद्धा वाजारपेठ होती. बाजारपेठ म्हणून तिचा नावलौकिक होती नाशिक जिल्हा कांदा, टोमॅॅटो व द्राक्ष हया नगदी पिकांच्या उत्पादनासाठी अग्रेसर आहे.पिंपळगाव कॄषी समितीचे कार्यक्षेत्र हे पिंपळगाव तालुक्यातील काही गावांसाठी आहे. दरवर्षी मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतीमालाची वाढती आवक ही पिंपळगाव बाजार समितीच्या कामाची पावती आहे.कॄषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण भागांमधील लोकांची विश्वासपात्र अशी नामांकित बाजारपेठ बनली आहे.या बाजार समितीने व्यापारी व कामगार बाजरपेठेचा केंद्रबिंदू मानली आहे.शेतक–यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा त्यांची आर्थिक फसवणुक होऊ नये या उद्देशाने या बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे.बाजार समितीमुळे पिंपळगाव परिसर समॄद्ध झाला आहे.

Source by अमोल राठी #जयहिंद Source by अमित कुंदे-पाटील #जयहिंद

हे सुद्धा पहा[संपादन]