वल्लभनगर एस.टी. बस स्थानक
Appearance
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वल्लभनगर एस.टी. बसस्थानक महाराष्ट्राच्या पिंपरी-चिंचवड शहरात आहे.
हे स्थानक पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावरील कासारवाडी रेल्वे स्थानकापासून अंदाजे १ किमी अंतरावर पुणे-मुंबई महामार्गालगत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचा वल्लभनगर बस थांबा या स्थानकाजवळ आहे.