Jump to content

पार्क चुंग-ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पार्क चुंग-ही

दक्षिण कोरियाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२४ मार्च १९६२ – २६ ऑक्टोबर १९७९
मागील यून बॉ-सिऑन
पुढील चॉय क्यु-हा

जन्म ३० सप्टेंबर, १९१७ (1917-09-30)
गुमी, जपानी कोरिया
मृत्यू २६ ऑक्टोबर, १९७९ (वय ६२)
सोल, दक्षिण कोरिया
धर्म बौद्ध
सही पार्क चुंग-हीयांची सही

पार्क चुंग-ही (कोरियन: 박정희; ३ मार्च १९३० [काळ सुसंगतता?] - २६ ऑक्टोबर १९७९) हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. १९६१ सालच्या लष्करी बंडादरम्यान त्याने दक्षिण कोरियाची सत्ता बळकावली. १९६३ मधील निवडणुकीत विजय मिळवुन तो अधिकृतपणे देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्यापुढील त्याच्या १६ वर्षांच्या कार्यकाळात चुंग-हीने युद्धात उध्वस्त झालेल्या दक्षिण कोरियाला प्रगतीपथावर नेले व देशाचे झपाट्याने उद्योगीकरण केले. परंतु त्याचबरोबर एका हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवण्याच्या त्याच्या शैलीवरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली.

२६ ऑक्टोबर १९७९ रोजी चुंग-हीची त्याच्याच एका सुरक्षा अधिकाऱ्याने हत्या केली.

२५ फेब्रुवारी २०१३ रोजी चुंग-हीची मुलगी पार्क ग्युन-हे ही राष्ट्रीय अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून दक्षिण कोरियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: