किम डे-जुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किम डे-जुंग
Kim Dae-jung (Cropped).png

दक्षिण कोरियाचा ८वा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२५ फेब्रुवारी १९९८ – २५ फेब्रुवारी २००३
मागील किम यूंग-साम
पुढील रोह मू-ह्युन

जन्म ३ डिसेंबर १९२५ (1925-12-03)
हुइदो, दक्षिण जेओला प्रांत, जपानी कोरिया
मृत्यू १८ ऑगस्ट, २००९ (वय ८३)
सोल
धर्म रोमन कॅथलिक
सही किम डे-जुंगयांची सही

किम डे-जुंग (कोरियन: 김대중; ३ डिसेंबर १९२५ - १८ ऑगस्ट २००९) हा दक्षिण कोरियाचा ८वा राष्ट्राध्यक्ष होता. डे-जुंग त्याच्या हुकुमशाहीविरोधी धोरणांसाठी आशियाचा नेल्सन मंडेला म्हणून ओळखला जातो. उत्तर कोरियासोबतचे विवाद मिटवून दोन्ही देशांमध्ये बंधुत्व निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न उल्लेखनीय होते. ह्या प्रयत्नांसाठी त्याला २००० साली नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.