पाथरड (नेर)
?पाथ्रड (गोळे) महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नेर |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/29 |
पाथ्रड (गोळे) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
गावात नेर तलाव प्रकल्प नावाचे एक धरण आहे. धरणांमधून कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा हिवाळ्यात गहू हरबरा व इतर अनेक पिकांकरिता केला जाते.
धरणाच्या पाणी साठ्या मुळे गावातील व आसपास मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात आहे. तालुका स्तरावर नेर शहराला पिण्यासाठी व घरगुती वापरकरिता पाणी पुरवठा याच धरणांमधून केला जातो.
नेर शहरी भागा व्यतिरिक्त शेजारील गावाला सुद्धापाणी पुरवठा केला जातो.
नेर परसोपंत (तालुका)
धनज मनिकवाडा ( शेजारील गाव )
वटफळी ( शेजारील गाव )
वरील गावांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी पाणी पुरवठा केला जातो.
गावामध्ये मोठ्या प्रमाणात बागायती शेती असून संत्रा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
या व्यतिरिक्त कापूस , सोयाबीन , तुर , उडीद , मुंग हे पारंपरिक पिके सुद्धामोठ्या प्रमाणात घेतली जातात.
लोकजीवन
[संपादन]पाथ्रड (गोळे) हे गाव एक छोटस गाव असून त्या गावात अनेक जमाती आढळून येतात. साधारणतः हिंदू व बौद्ध धर्मीय लोक या गावात राहतात.
गावामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्मीय लोक आहे.
हिंदू धर्मा अंतर्गत गावात तिरळे कुणबी समाज , खेडुले कुणबी , बावणे कुणबी , धनगर समाज , बंजारा समाज असून आदिवासी समुदायातील गोंड जमातीचे लोक या गावात आहे.
गाव हे अनेक जाती धर्मातील लोकांनी मिळून बनलेल असलं तरी या गावातील लोक एकोप्याने राहतात.. अनेक धार्मिक कार्यक्रम या गावात वेळोवेळी होतात व सर्व गावकरी मंडळी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता गावात एकोप्याने सार्वजनिक , धार्मिक सण उत्सव साजरे करतात.
गावात बंजारा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे बंजारा समाजाची सांस्कृतिक पार्श्वभूमी या गावाला आढळलेली मिळते....या समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम हा समाज करतांना दिसून येते.
या व्यतिरिक्त आदिवासी समाज हा या गावात असून त्यातील गोंड जमात आढळून येते. हा समाज मोठ्या प्रमाणात त्यांची संस्कृती जपतांना आढळून येईल.
या गावातील अनेक लोक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले आपल्याला आढळून येईल. मोठ्या प्रमाणात अनेक गावातील राजकीय लोकांनी तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय पंचायत राज व्यवस्थेत अनेक पदे भोगली आहे.
गावात शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी दिसून येईल. अनेक शासकीय अधिकारी या गावात आहे. वर्ग 1 ली ते वर्ग 7 वी पर्यंत शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा या गावात आहे.....