पर्यावरणीय स्त्रीवाद किंवा स्त्रीवादी पर्यावरणवाद ह्या संकल्पना पर्यावरणाविषयीच्या आणि स्त्रीवादी चळवळींना जोडणारा दुवा आहे. ह्या एकत्रित चळवळीद्वारे समाजातील फ़क्त स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यालाच वाचा फ़ोडली जाते असेच नव्हे तर समाजातील सर्वच प्रकारच्या शोषणांना विरोध करून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केले जातात. फ़्रेंन्कोइज डिबोन्ने ह्या फ़्रांन्सच्या लेखिकेनी तिच्या ले फ़ेमिनेजम औला मोर्ट ह्या १९७४ साली लिहिलेल्या पुस्तकात पहिल्यांदा ह्या संकल्पनेचा वापर केल्याचे समजले जाते.[१] ह्या विचारधारे मध्ये असे गृहित धरले जाते की, स्त्रीयांच्या शोषणाच्या पद्धती आणि निसर्गाच्या शोषणाच्या पद्धतींमध्ये काही साम्य आहे आणि ते साम्य स्त्रीया, काळे लोक, मुले, गरिब इ. व त्याचप्रकारे निसर्सगातील प्राणी, जमिन, पाणी आणि वायू ह्या गटांच्या शोषणामध्येही वर्चस्ववादी गटांकडून वापरले जाते. ह्या सर्वंच मानव जातीतील आणि निसर्गातील दमित गटांना पाश्चात्य पुरुषसत्तेच्या सत्तेखाली दमनाला सामोरे जावे लागते. पर्यावरणवादी स्त्रीवाद्यांचे असे प्रतिपादन आहे की, ज्या गुणांना ’बायकी’ म्हणले जाते ते सर्वंच गुण निसर्गातील घटकांना लावून पाहिले जातात, जसे की, सहयोग, सर्जनशिलता, देवाण घेवाण जे निसर्गात आणि स्त्रीयांमध्ये समानरित्या अस्तित्वात असतात.[२][३]