रविराज गंधे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रविराज गंधे हे एक माध्यमतज्ज्ञ, दूरदर्शन कार्यक्रम अधिकारी आणि लेखक-पत्रकार आहेत. ते कथा आणि माध्यम, पर्यावरण विषयक लेखन करतात. गंधे यांनी सत्यकथा आणि अन्य मासिकांतून कथालेखन तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, दिव्य मराठी आदी वृत्तपपत्रामध्ये त्यांचे माध्यम आणि पर्यावरण विषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. या विषयावरील, प्रतिष्टित संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक परिसंवादात त्यांचा सहभाग असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची व्याख्याने झाली आहेत. त्यांनी रेडिओ, दूरचित्रवाणीआणि वृत्तपत्रे यांतून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखती व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ’ग्रंथाक्षर’ ह्या दिवाळी अंकाचे आणि ‘जागर पर्यावरणाचा’ या पर्यावरणतज्ञांच्या मुलाखतींच्या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. पुण्या–मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम’ ह्या विषयांवरील व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र् शासनाच्या राज्य चित्रपट पुरस्कार स्पर्धेसाठी तसेच MIFF मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पर्यावरण लघुपट वसुंधरा अवॉर्ड आदी विविध स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणुन काम केले आहे.

गंधे यांनी मुंबई दूरदर्शनसाठी पुस्तक–परिचय करून देणाऱ्या ‘अमृतवेल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाला ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार प्राप्त झाले.मुंबई साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रसारक हा प्रतिष्टेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या माध्यमरंग ह्या माध्यमाविषयक पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक ह्या संस्थेचे उत्कृष्ठ ललितेतर साहित्यकृती म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 2020 साली ग्रंथाली ने त्यांचे माध्यम यात्रेतील माणसं हे पुस्तक प्रसिद्ध केले.सदर पुस्तकात रविराज गंधे यांनी वृत्तपत्रे आणि दुरदर्शन साठी घेतलेल्या अनेकविध दिग्गज साहित्यिक, कलावंत, गायक आदींच्या बहारदार मुलाखतींचा समावेश आहे. 2022 साली नवचैतन्य प्रकाशन ने गंधे यांचे कथा, कविता, लेख, मुलाखती पत्रव्यवहार आदी विविध साहित्य कृतींचा अंतर्भाव असलेले भिरभिरं हे पुस्तक प्रसिद्ध केले.डिंपल प्रकाशन ने त्यांचे पर्यावरण तज्ञांच्या मुलाखतींचे वेध पर्यावरणाचा हे पुस्तक 2017 साली प्रकाशित केले.आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरून त्यांनी जागर पर्यावरणाचा ही पर्यावरण विषयक 52 भागांची मालिका सादर केली होती.

पुस्तके[संपादन]

  • वेध पर्यावरणाचा (संपादित, डिंपल प्रकाशन दिनांक ४-६-२०१७)
  • जागर पर्यावरणाचा (संपादित ग्रंथायन,5 जून2009)
  • माध्यमरंग (माध्यम विषयक पुस्तक ग्रंथाली 26डिसें 2018)
  • माध्यमायात्रेतील माणसं (माध्यमक्षेत्रातील दिग्गज लेखक-कलावंतांच्या मुलाखतींचा संग्रह प्रकाशन 26 डिसें 2020 ग्रंथाली)
  • भिरभिर (कथा, लेख,मुलाखती व पत्रव्यवहार आदी चा अंतर्भाव असलेले संकीर्ण पुस्तक. प्रसिद्ध 15 डिसेंबर 2022 नवचैत्यन्य प्रकाशन