पण लक्षात कोण घेतो?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Pan Lakshat Kon Gheto (en); पण लक्षात कोण घेतो? (mr) Marathi novel by Hari Narayan Apte (en); मराठी कादंबरी (mr); roman de Hari Narayan Apte (fr); boek van Hari Narayan Apte (nl) But Who Cares! (en)
पण लक्षात कोण घेतो? 
मराठी कादंबरी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसाहित्यिक कार्य (मराठी भाषा)
गट-प्रकार
 • सामाजिक समस्या काल्पनीक कथा
 • आत्मचरित्र
मूळ देश
लेखक
प्रकाशन तारीख
 • इ.स. १८९०
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पण लक्षात कोण घेतो (इंग्रजी: बट हू केअर्स...) ही हरी नारायण आपटे यांची १८९० मधील मराठी भाषेतील कादंबरी आहे. आत्मचरित्रात्मक शैलीत लिहिलेली, ही कादंबरी यमुना या तरुण हिंदू मध्यमवर्गीय महिलेची कथा सांगते, जिचा बालविवाह प्रथा असलेल्या समाजातील अन्याय सहन करून मृत्यू होतो. मराठी साहित्यातील ही एक उत्कृष्ट कादंबरी मानली जाते.

पण लक्षात कोण घेतो? च्या १८९० च्या प्रकाशना आधी कादंबऱ्या ह्या मनोरंजनासाठी लिहील्या आणि वाचल्या जात असे.[१] ह्या कादंबरीने बाल विधवांच्या जीवनाचे अनावरण केले व पारंपारिक शैलीपासून एक महत्त्वपूर्ण अंतर ठेवून ही लिहीली गेली होती.[२] आपटेयांनी ह्या आधी अनेक निबंध व टीका प्रकाशित केल्या होत्या. महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाशी संबंधित त्यांची पहिली कादंबरी मधली स्थिति १८८५ मध्ये प्रकाशित झाली होती.

कथानक[संपादन]

यमुना या तरुण विधवाच्या दृष्टीकोनातून आत्मचरित्राच्या स्वरूपात ही कादंबरी लिहिली गेली आहे.[३] या कथेत यमुनेचे आयुष्य व्यापलेले आहे आणि वाचकाला तिच्या आयुष्यातील अनेक लोकांची ओळख करून दिली जाते ज्यात जवळपास ४० पात्रे आहे.[२]

यमुनेची कहाणी अल्पायुषी पण रमणीय बालपणापासून सुरू होते. आनंदी असला तरी, यमुनाची आई आणि आजी आश्रित या नात्याने त्यांच्या असुरक्षिततेबद्दल वाटून घेणाऱ्या भीतीने तिच्या बालपणात अंधार झाला होता. बाराव्या वर्षी तिचा विवाह रघुनाथराव या तरुणाशी झाला. तो उदारमतवादी आहे आणि त्याला यमुनाला घडवायचे आसते. पण तो तिची कौटुंबिक परिस्थिती बदलू शकत नाही. यमुनाचा तिच्या सासरच्या लोकांकडून छळ केला जातो आणि कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाकारले जाते.[३]

जेव्हा यमुनाची आई मरण पावते तेव्हा तिचे वडील लगेचच पुन्हा लग्न करतात, यावेळी एका बारा वर्षांच्या मुलीशी. यमुना आणि तिचा भाऊ गणपतराव हे एकमेकांबद्दल खूप प्रेमळ असले तरी त्यांच्या वडिलांच्या घरात आनंदी नसतात. तिच्या भावाची मूर्ख पत्नी यमुनाच्या वैवाहिक जीवनाला नरकासमान बनवते. यमुना आणि तिचा नवरा मुंबईला (तेव्हाचे बॉम्बे) जातात जीथे दोघांनाही थोडा आनंद मिळतो. मुंबईमध्ये ती काही सुधारणावादी कुटुंबांना भेटते जी तिला स्वातंत्र्य मिळणे काय असते हे दाखवतात. तिथे असताना, यमुना तिची मैत्रिण दुर्गाला तिच्या भ्रष्ट पतीपासून मुक्त करते आणि तिचा भाऊ त्याचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी तिच्याकडे राहायला येतो.[३]

परंतु यमुनेच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन होते आणि तिचा आनंद आणि स्वातंत्र्य अचानक संपते. यमुनाला तिच्या सासरी परत जाण्यास भाग पाडले जाते, जिथे तिच्या सासऱ्यांनी देखील तरुण मुलीशी लग्न केले आहे. यमुनेचे सासरचे लोक तिचे सोने लुटतात आणि पवित्रतेच्या प्रथेच्या नावाखाली जबरदस्तीने तिचे मुंडण करतात. तिचा भाऊ तिच्या संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही. तिची जीवनकथा लिहिल्यानंतर काही काळाने तिचा मृत्यू होतो.[३]

प्रतिसाद[संपादन]

मराठी साहित्यात ही कादंबरी एक अभिजात साहित्यापैकी एक मानली जाते, ज्याला काहीवेळा स्त्रीवादी साहित्य म्हणून संबोधले जाते.[४] ह्या कादंबरीचा हिंदू सुधारणा चळवळींवर तिचा मोठा प्रभाव पडला होता.[५] अ हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर (१९८८) या पुस्तकात कुसुमावती देशपांडे आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष लिहीतात की; "ही कादंबरी आपल्या प्रकारची पहिलीच आहे आणि तरीही ती अनेक प्रकारे अतुलनीय आहे. हे एका विधवेच्या आत्मचरित्राच्या रूपात साकारली आहे. हे अशा शैलीत लिहिलेले आहे जे योग्यरित्या स्त्रीप्रिय, आणि शुद्ध असेल, जर चपखलही आहे. मराठी काल्पनिक कथांमध्ये प्रथमच एखादे पात्र गतिमानपणे आणि सर्व परिमाणांमध्ये चित्रित केले आहे."[६]

पण लक्षात कोण घेतो? ही अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाली. इंग्रजीतील भाषांतर संतोष भूमकर यांनी बट हू केअर्स... (२०१५) असे केले जी साहित्य अकादमीने प्रकाशित केली होती.[४] राजकारणी आणि भारताचे पंतप्रधान, पी.व्ही. नरसिंहराव हे एक विपुल लेखक होते आणि त्यांना १७ भाषा बोलता येत होत्या. त्यांची मातृभाषा तेलुगू असली तरी ते मराठीचे उत्तम वक्ते होते आणि मराठी भाषेत भाषणेही देत असत; जसे अखिल भारतीय मराठी संमेलनात. त्यांनी तेलुगूमध्ये अबला जीवीतम या नावाने ही कादंबरी भाषांतरित केली.[७][८][९]कन्नड साहित्यकार के. शिवराम कारंत यांच्या पत्नी लिला कारंत यांनी या कादंबरीचा कन्नडमध्ये अनुवाद केला.[१०] गोपाळराव विद्वांस यांनी केलेला गुजराती अनुवाद १९७५ मध्ये मेरी करमकथानी या शीर्षकाने प्रकाशित झाला.[११]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Yogendra K. Malik (1981). South Asian Intellectuals and Social Change: A Study of the Role of Vernacular-speaking Intelligentsia. New Delhi: Heritage Publishers. p. 53. ISBN 9780836408256. OCLC 9079573.
 2. ^ a b Amaresh Datta; Mohan Lal (2007). Encyclopaedia of Indian Literature: Navaratri-Sarvasena (4th ed.). New Delhi: साहित्य अकादमी. p. 3057. ISBN 9780836422832.
 3. ^ a b c d George, K. M., ed. (1993). Modern Indian Literature: an Anthology: Fiction. 2. New Delhi: Sahitya Akademi. pp. 687–688. ISBN 81-7201-506-2.
 4. ^ a b Roy, Devapriya (2017-03-19). "Fourteen Marathi classics, handpicked by Bhalchandra Nemade, that must be read (and translated)". Scroll.in. 2018-12-10 रोजी पाहिले.
 5. ^ Simon Weightman (1996). Indian Subcontinent. Passport Books. p. 198. ISBN 978-0-8442-8970-0.
 6. ^ Deśapāṇḍe, Kusumāvatī; Rājādhyaksha, Maṅgeśa Viṭṭhala (1988). A History of Marathi Literature. New Delhi: Sahitya Akademi. pp. 88–89. OCLC 19585943.
 7. ^ Rajendra Kumar (January 0101). President and Prime Minister of India. Prabhat Prakashan.
 8. ^ S. Gajrani, ed. (2004). History, Religion and Culture of India: History, Religion and Culture of Western India. 3. Delhi: Isha Books. p. 264. ISBN 978-81-8205-062-4.
 9. ^ S. C. Bhatt; Gopal K. Bhargava, eds. (2006). Land and People of Indian States and Union Territories: Maharashtra. 16. Delhi: Kalpaz Publications. p. 234. ISBN 978-81-7835-372-2.
 10. ^ Ramachandran, C. N. (2001). K. Shivarama Karanth. New Delhi: Sahitya Akademi. p. 16. ISBN 978-81-260-1071-4.
 11. ^ Rao, D. S. (2004). Five Decades: The National Academy of Letters, India : a Short History of Sahitya Akademi. New Delhi: Sahitya Akademi. p. 48. ISBN 978-81-260-2060-7.