Jump to content

न्यू कूच बिहार जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू कूच बिहार
নিউ কোচবিহার
भारतीय रेल्वे स्थानक
इमारत
स्थानक तपशील
पत्ता कूच बिहार, कूच बिहार जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक 26°12′11″N 89°28′11″E / 26.20306°N 89.46972°E / 26.20306; 89.46972
समुद्रसपाटीपासूनची उंची ४८ मी
मार्ग बरौनीगुवाहाटी रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९६६
विद्युतीकरण नाही
संकेत NCB
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग अलिपूरद्वार विभाग, उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र
स्थान
न्यू कूच बिहार is located in पश्चिम बंगाल
न्यू कूच बिहार
न्यू कूच बिहार
पश्चिम बंगालमधील स्थान

न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्याच्या कूच बिहार शहरातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेले कूच बिहार न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी मार्गावर स्थित असून ईशान्य भारताकडे जाणाऱ्या सर्व गाड्या कूच बिहारमार्गेच धावतात.

१९०१ साली कूच बिहार संस्थानाचे राजे नृपेंद्र नारायण ह्यांनी नॅरोगेजवर चालणाऱ्या कूच बिहार रेल्वेचे उद्घाटन केले. १९१० साली हा मार्ग मीटर गेजमध्ये रूपांतरित करण्यात आला. १९४७ सालच्या भारताच्या फाळणीनंतर बांगलादेशाच्या भूभागातून धावणारे अनेक मार्ग बंद पडले व ह्या भागतील रेल्वे व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर नवे रेल्वेमार्ग बनवले व १९६६ साली न्यू कूचबिहार स्थानक कार्यान्वित झाले.

प्रमुख गाड्या

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]