निसर्गोपचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'निसर्गोपचार' चिकित्सेत नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग करतात. मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता ही चिकित्सा केली जाते. नॅचरोपॅथी द्वारे पुर्ण शरीराची काळजी घेऊ शकते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. जुन्यातला जुना आजार बरा करण्यासाठी नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार पध्दतीचा वापर केला जातो.

निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्या रूग्णाच्या जीवनशैलीवर लक्ष देतात. निसर्गोपचार पध्दतीत काहीवेळा होमिओपॅथी, आर्युवेद, स्पायनल मॅनिप्यूकेशन, न्युट्रिशन, हायड्रोथेरेपी, मसाजव्यायाम अशा अनेक प्रकारच्या पर्यायी उपचार पध्दतीचा ही उपयोग करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.