अतिउष्णतेद्वारे उदरपोकळीत रसायनोपचार
अतिउष्णते द्वारे उदारपोकळीत रसायनोपचार (Hyperthermic Intraperitoneal Chemotherapy (HIPEC))[संपादन]
अतिउष्णते द्वारे उदारपोकळीत रसायनोपचार हे तंत्र शल्यचिकित्सेबरोबर एकत्रितपणे पोटाच्या विकसित कर्करोगावर उपचारासाठी वापरले जाते.
ह्या उपचाराचे तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभाजन केलेले आहे.
अन्वेषण[संपादन]
या प्रक्रियेत शल्यचिकित्सक ओटीपोट उघडून उदरपोकळीतील कर्करोगाचे मापन करतात.
अपसारण[संपादन]
अपसारण ह्या टप्यातील प्रक्रियेत शल्यचिकित्सक दृश्य स्वरूपातील कर्करोगाच्या प्रत्यारोपीत गाठींना काढून टाकतात. तथापि जरी सर्व दृश्य स्वरूपातील प्रत्यारोपीत गाठी काढल्या तरी काही सूक्ष्म स्वरूपातील कर्करोग पेशी उदारपोकळीत बाकी राहतात असल्याने, अतिंम टप्प्यात ह्या बाकी राहिलेल्या पेशींना काढण्यात येते.
रसायनिकद्रवनिवेशन[संपादन]
ह्या प्रक्रीयेमध्ये उदारपोकळी अतिउष्ण रसायनोपचार द्रावानी भरण्यात येते व ह्या द्रावणाचे तापमान विशिष्ट ठिकाणी राखले जाते.
प्रचलित रसायनोपचार पद्धतीशी तुलना आणि फायदे[संपादन]
प्रणालीगत रसायनोपचार पद्धतीमध्ये रसायनोपचार हा रक्त प्रवाहाद्वारे सपूर्ण शरीरावर केल्या जातो तर त्याच्या विपरीत अतिउष्णते द्वारे उदारपोकळीतील रसायनोपचार हा ब-याच अंशी विविक्त उदारपोकळीत केल्या जातो, त्यामुळे खूप जास्त सांद्रतेचे रसायनोपचार द्रव वापरता येते आणि प्रणालीगत रसायनोपचार पद्धतीमध्ये होणारे विषक्तता व इतर दुष्प्रभाव कमी करता येतात.
भारतातील सुविधा[संपादन]
जरी अशातऱ्हेच्या शत्रक्रिया जगात अतिशय मोजक्या ठिकाणी होत असल्या तरी भारतात मुंबई येथील शासकीय "सायन रुग्णालय " येथे ह्या शत्रक्रिया नियमित केल्या जातात.

रुग्णालय |
---|
|